उमरगा । साक्षीदार न्युज । उमरगा व लोहारा तालुक्यातील दिव्यांच्या बांधवांच्या समस्या निर्माण झाले असून, त्याचे त्वरित निराकरण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन रयत क्रांती पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने यांनी तहसीलदार गोविंद येरमे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केलें आहे.
तहसीलदार गोविंद येरमे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यात दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या आहेत. अनेक दिव्यांग व कुष्ठरुग्णांचे आधार कार्ड अपडेट होत नाहीत. . त्यामुळे ते ते शासकीय योजनेपासून वंचित आहेत. त्यांना शासनदरबारी हेलपाटे मारावे लागत आहेत. शासनाने विशेष समिती गठीत करुन या व्यक्तींच्या घरापर्यंत जात समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.
यासंबंधी रयत क्रांती पक्ष कडून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपयांची पेंशन द्यावी. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदेत दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्यावे, भूमिहीन बेघर दिव्यांगांना घरकुल मंजूर करावे, सार्वजनिक, सरकारी कार्यालये अडथळा विरहित करा. शासकीय नोकरीत सूट द्यावी. व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. दहा लाखांचा आरोग्य विमा सरकारने काढावा. उत्पन्न मर्यादा एक लाखांहून जास्त करावी, कुष्ठरोगी व हाता-पायाची बोटे नाहीत त्यांना अगोदरपासूनची पेन्शन द्यावी. आदी १९ मागण्यांचे निवेदन तहसीलदार गोविंद येरमे यांना देण्यात आले. २३ जानेवारीपर्यंत मागण्यांची पूर्तता करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
यावेळी रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने, बाळासाहेब माने, इसाक शेख, राहुल मन्नाडे, रामेश्वर मदने, चाॅंद शेख, निळकंठ कांबळे, एजाज शेख, सुधाकर पवार, सतिश जाधव आप्पासाहेब अनिगरे, उमाकांत भोसले, सोनबा सुर्यवंशी, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.