आरोग्य केंद्र-गोरगावले बु.येथे डेंग्यू दिवस केला साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

आरोग्य केंद्र-गोरगावले बु.येथे डेंग्यू दिवस केला साजरा

जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ. सचिन भायेकर आणि जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.तुषार देशमुख यांच्या आदेशानुसार तथा
चोपडा तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या सूचनेप्रमाणे.. तसेच,
आरोग्य केंद्र गोरगावले बु. येथील वैद्यकीय अधिकारी-डॉ.शर्वरी पाटिल, डॉ.शिल्पा बोरसे, यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राथमिक आरोग्य केंद्र-गोरगावले बु.ता.चोपडा येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला.

- Advertisement -

आज दिनांक-१६ मे २०२४ गुरुवार रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून.. तालुका हिवताप आरोग्य सहाय्यक-जगदीश बाविस्कर यांनी उपस्थिताना, १६ मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा का करण्यात येतो? या २०२४ वर्षाचे घोषवाक्य “समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा” बाबत देखील माहिती विषद करून दिली.

- Advertisement -

डेंगू अजाराविषयीची तपासणी कोठे होते, डेंग्यू आजारावरील लक्षणे काय, त्याची कारणे, उपचार काय व ते कसे करावेत, आणि आजार होऊ नये याबाबत ठोस उपाय योजना काय कराव्यात, याबाबत सविस्तर मार्गदर्शन हे तालुका पर्यंवेक्षक-जोशी नाना यांनी केले.

सदर डेंग्यू तापाच्या जनजागृती प्रसंगी..
जिल्हास्तरीय पर्येंवेक्षक-विजय देशमुख, तालुका हिवताप पर्येंवेक्षक- परेश जोशी, तालुका हिवताप आरोग्य सहाय्यक-जे.वाय.बाविस्कर, पी.के.पाटिल (एच.ए-हातेड) प्राआकेंद्र-गोरगावले बु.चे आरोग्य सहाय्यक-आर.ए.काटे, सुनील महाजन, आरोग्य सेवक-आशिष लोसरवार, आरोग्य सेविका-श्रीम.वैशाली सोनवणे,शेवंता बारेला, राजेंद्र गिरासे आदी कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS