Dengue ; यावल शहरात डेंग्युचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव – नागरीकांचे आरोग्य धोक्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Dengue

यावल ( साक्षीदार न्युज ) ; – शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोठया प्रमाणावर डास व मच्छर यांचा उपद्रव वाढला असुन शहरातील विविध भागात डेंग्यू व मलेरीया रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये रुग्ण उपचार घेत असुन नागरिकांमध्ये आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असुन म्हणून पालिका प्रशासन व तालुका आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करावी म्हणून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी नगर परिषद प्रशासनाला पत्र देऊन मागणी केली आहे.

- Advertisement -

याबाबत यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिलेल्या गेल्या काही दिवसांपासून डास व मच्छर यांचा उपद्रव वाढल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात डेंग्यू व मलेरिया आजारा चे रुग्ण उपचार घेत असल्याचे चित्र आहे. शहराच्या विविध भागांत मोकळ्या जागेवर पाण्याचे व गटारीचे डबके साचलेले असुन त्या वरील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे एडीस इजिप्ती नावाचे डेंग्यू आजाराच्या अळ्या तयार होत आहे. या अळ्यांमुळे डासांची उत्पत्ती होत असुन शहरातील नागरीक डेंग्यू व मलेरिया या आजारांमुळे बाधीत होत आहे. म्हणून यावल नगरपरिषदने तालुका आरोग्य विभाग यांची मदत घेऊन घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करावे व ज्या भागांत मोकळ्या जागेत डबके साचलेले असतील ते ठिकाण माती टाकून बुजुन नष्ट करावे अशी मागणी केली जात आहे.

यावल शहरातील प्रत्येक भागात नगर परिषद प्रशासनाने नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेत कान्या कोपऱ्यात धुरळा फवारणी करावी व गटारी वर बीएससी पावडर मारावी.नगरपरिषद ने पथक तयार करून तालुका आरोग्य विभाग यांच्या मदतीने घरोघरी जावुन रुग्णांची आरोग्य तपासणी करून सर्व्हेक्षण करावे व रूग्णांवर शासकीय इस्पितळात उपचार करून मोफत औषधी उपचार करावेत अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS