साक्षीदार | ३१ ऑक्टोबर २०२३ | राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक जिल्ह्यात आंदोलन सुरु आहे तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठकीवर बैठका सुरु आहे. तर उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व अजित पवार सध्या कुठेही दिसत नसल्याने विरोधकांनी या दोन नेत्यांवर आता टीका सुरु केली आहे. यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि, स्वराज्य जळत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पक्षाचा प्रचार करण्यासाठी जयपूरला गेले होते. त्यांना राज्यातील मराठा तरुणांच्या आत्महत्येपेक्षा प्रचार जास्त महत्त्वाचा आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. राज्य सरकारने काहीही करावे मात्र, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर मार्ग काढावा, असे आवाहन देखील त्यांनी केले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर त्यांनी सरकावर हल्लाबोल केला.
महाराष्ट्रात सध्या अस्वस्थता आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावावा. आम्ही सरकारसोबत असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील यांनी देखील आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मराठा समाजाने टोकाचे पाऊल उचलू नये, असेही ते म्हणाले. महारष्ट्रातील सर्व केंद्रीय मंत्र्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व भाजच्या मंत्र्यांची नावे, घेत उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न लाेकसभेतून सोडवण्याची मागणी केली. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी चिंतामनराव देशमुख यांचेही उदाहरण दिले. राजीनाम्यांचा मोदी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. परस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राजीनामा देण्याऐवजी पंतप्रधानांशी बोलून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केले.