धम्म शिबिरांमधुन धम्मक्रांति होणार : के. वाय. सुरवाडे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (साक्षीदार न्युज ) :- आज भारतात बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे याचे मुख्य कारण भारतीय बौद्ध महासभा शहरो शहरी , गावोगावी मोठ्या प्रमाणात घेत असलेली श्रामणेर शिबिरे हे होय , धम्म शीबिरां मधूनच धम्म क्रांती होईल असे स्पष्ट मत भारतीय बौद्ध महासभा चे राज्य संघटक के. वाय. सुरवाडे यांनी व्यक्त केले .

- Advertisement -

जळगाव येथील जेतवन बुद्ध विहाहारात आयोजित दहा दिवसीय श्रामणेर शिबिरात मार्गदर्शन करतांना सुरवाडे बोलत होते . यात त्यांनी बौद्ध धर्माचे संदेश वाहक , संस्कार विधी , पंचशील ध्वज , भगवान बुद्ध – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र , परित्राण पाठ अश्या विविध विषयांवर प्रवचन दिले .मुंबई येथील दिपंकर महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली एक जून पासून सदर शिबिर सुरू आहे त्यांनी चीवर परिधान व चीवराचे महत्व अत्यंत सखोलतेने मांडले .

या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ , बी. एस. पवार , दिलीप तासखेडकर , अशोक सैनदाणे , प्रमोद मेढे , जिल्हा सचिव सुभाष सपकाळे , सुकदेव इंगळे , सुनील बिऱ्हाडे , राजेश इंगळे , संजय मोरे , विमल भालेराव , कविता सपकाळे , अलका मोरे ई. मान्यवर हजर होते .
या शिबिरात २४ श्रामणेर सहभागी झाले आहेत . विविध भागातील श्रद्धावान मोठ्याप्रमाणात शिबिरास भेट देवून विविध प्रकारचे धम्मदान देत आहेत तसेच विविध प्रवचनांचा लाभ घेत आहेत . रोज सकाळी मंगल मैत्री कामना , धम्म फेरी , बुद्ध पूजा पाठ , ध्यान धारणा आदी उपक्रम होत असतात .

- Advertisement -

सदर शिबिराचा समारोप दहा रोजी होणार आहे या समारंभास जनतेने मोठ्या संख्येने पांढऱ्या गणवेशात हजर रहावे असे आवाहन दिपंकर महाथेरो यांनी केले आहे .

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS