back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत धनंजय चौधरी यांनी भरला उमेदवारी अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रावेर (सुनिल भोळे : – रावेर यावल विधानसभा क्षेत्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी कटीबध्द राहण्यासाठी व पूर्वजांचा या परिसराला विकसित करण्याचा वसा पुढे नेण्यासाठी रावेर यावल विधानसभा क्षेत्र निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दाखल केला.

- Advertisement -

Dhananjay Chaudhary

याप्रसंगी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे साहेब, आ.शिरीषदादा चौधरी, बऱ्हाणपूरचे माजी आमदार सुरेन्द्रसिंग ठाकूर(शेरा भैय्या), ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील, शिवसेना जिल्हा समन्वयक प्रल्हादभाऊ महाजन, माजी आमदार रमेशदादा चौधरी, हाजी छत्ब्बीर शेठ, श्रीरामदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, मुक्ती हारून नदवी, एजाजभाई मलिक, राजू अमीर तडवी यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना धनंजय चौधरी म्हणाले की, या जनआशीर्वाद रॅलीत सहभागी होऊन जनसामान्यांनी दिलेले आशीर्वाद हे उद्याच्या विजयाची नांदी आहेत. जनआशीर्वाद रॅलीत सहभागी सर्व नागरिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले हे आशीर्वाद असेच कायम ठेवा.

- Advertisement -

यावेळी मान्यवरांसोबत काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, संदीपभैय्या पाटील, भगतसिंगबापू पाटील, जमीलभाई शेख, माजी जिल्हापरिषद सदस्य प्रभाकरअप्पा सोनवणे, सौ. सुरेखाताई नरेंद्र पाटील, मासुम तडवी, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान बाबुराव पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधरशेठ चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य विलासशेठ तायडे, शेखर पाटील, ज्ञानेश्वर बऱ्हाटे, सर्फराज तडवी, राजूदादा सवर्णे, योगेश सोपान पाटील, दिपक पाटील, प्रशांत पाटील, काँग्रेस पक्षाचे डॉ.राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, किशोर पाटील, शिवसेना (उ.बा.ठा ) तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे, अविनाश पाटील, यावल माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, रावेर माजी नगराध्यक्ष हरीशशेठ गणवाणी, पीपल्स बँक चेअरमन सोपान साहेबराव पाटील, गोंडू महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, जावेद जनाब, देवेंद्रदादा चोपडे, असदभाई सैय्यद, राहुल, तायडे, संजय जमादार, राजू सवर्णे, रावेर शेख गयास शेख रशीद, असद मेम्बर, रफिक शेख, काझी साहब, युसूफ शेख, अय्युब मेम्बर, हाजी मुस्तुफा शेठ, रसूल मेम्बर, हाजी इक्बाल शेठ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गटनेते युनुस मेम्बर, कलिम मेम्बर, फैजपूर शहराध्यक्ष रियाज मेम्बर, यावल शहराध्यक्ष कदिरभाई खान, फैजपूर, यावल, रावेर येथील माजी नगरसेवक तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS