रावेर यावलच्या विकासाचे ध्येय ठेवत धनंजय चौधरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

रावेर ( सुनिल भोळे ) : –  रावेर यावलच्या रावेर यावलच्या औद्योगिक विकासासाठी, माता भगिनांच्या रक्षणासाठी व परिसराच्या सर्वांगिण विकासाचे ब्रीद घेऊन धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे, महाविकास आघाडी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी सांगितले.

- Advertisement -

आज मंगळवार (दि. २९) सकाळी ९.३० वाजता आठवडे बाजार रावेर येथून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी महाविकास आघाडीतील माजी मंत्री एकनाथराव खडसे, श्रीराम पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, ज्येष्ठ नेते ॲड. रविंद्रभैय्या पाटील, प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील, माजी आमदार अरुणदादा पाटील, राजाराम गणू महाजन, रमेशदादा चौधरी, संदीपभैय्या पाटील, राष्ट्रवादीचे एजाज मलिक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रावेर यावल परिसराचा विकास करण्यासाठी सदोदित प्रयत्न करणाऱ्या पूर्वजांच्या पाऊलवाटेवर अजून पुढचे पाऊल टाकत सकारात्मक व शाश्वत विकासाची परंपरा अधिक समृध्द करण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे प्रतिपादन यावेळेस धनंजय शिरीष चौधरी यांनी केले. याप्रसंगी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS