Mahashivratri 2026 धरणगाव | साक्षीदार न्यूज | येथील श्री भोलेसरकार राजराजेश्वर श्री सार्जेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या १५ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सुमारे २० ते २१ झाक्या (देखावे) सहभागी होणार असून त्यामध्ये भुतों की बारात, कालीमाता, बाबा बर्फानी, महाकाल आदी धार्मिक देखाव्यांचा समावेश असेल.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मिरवणूक रामदेवजी बाबा नगर येथून सुरू होऊन नियोजित मार्गाने गावातून मार्गक्रमण करणार आहे. मिरवणुकीदरम्यान धार्मिक वातावरण, भक्तिगीते आणि विविध देखावे यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे.
कार्यक्रमात गावातील तसेच परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि शिवमहोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री भोलेसरकार राजराजेश्वर श्री सार्जेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.







