Mari Mata Temple | मरीमाता मंदिर जीर्णोद्धारानिमित्त भव्य महाआरती व भंडारा; 15 हजारांहून अधिक भाविकांची उपस्थिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Mari Mata Temple | साक्षीदार न्यूज | धरणगाव येथील पूर्वापार ग्रामदैवत असलेल्या श्री मरीआई मंदिर जीर्णोद्धाराच्या पावन निमित्ताने भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मरीआई मंदिर संस्थान व जागृती युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाआरती व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १५ हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.

- Advertisement -

Mari Mata Temple

विधीवत पूजन व महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात

कार्यक्रमाच्या प्रारंभी धरणगाव नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाबाई सुरेश चौधरी, उपनगराध्यक्षा सुरेखा विजय महाजन तसेच नगरसेवक व नगरसेविकांच्या शुभहस्ते विधीवत पूजन व भव्य महाआरती संपन्न झाली. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गच्या सेवेकऱ्यांनी सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करून उपस्थित भाविकांना अध्यात्मिक ऊर्जा प्रदान केली.

- Advertisement -

15 हजार भाविकांनी घेतला महाप्रसाद

महाआरतीनंतर महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात आली.
महाप्रसादामध्ये वरण-भात-पोळी, शिरा व मटकी भाजी असा सात्त्विक व रुचकर प्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला. स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध नियोजन, उत्कृष्ट व्यवस्थापन व शांत वातावरणामुळे महाप्रसाद वितरण अतिशय सुरळीतपणे पार पडले.

Mari Mata Temple

मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

या धार्मिक व सामाजिक उपक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

तसेच मरीआई मंदिर संस्थानचे अध्यक्ष किशोर महाजन, उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, जागृती युवक मंडळाचे पदाधिकारी, समस्त माळी समाज, कुणबी पाटील समाज, मराठे समाज, श्री सावता माळी समाज सुधारक मंडळ (मोठा माळीवाडा), तिळवण तेली समाज आदी विविध समाजांचे अध्यक्ष व पंचमंडळ यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.

सेवाभावातून सहकार्य

महाप्रसादासाठी आवश्यक सर्व भांडी श्री सावता माळी समाज सुधारणा मंडळ, मोठा माळीवाडा यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रमासाठी लागणारे संपूर्ण पिण्याचे पाणी कृपा ॲक्वा, नमो आदेश ॲक्वा, चव्हाण ॲक्वा व ईश्वर सोनार यांच्या वतीने मोफत पुरवण्यात आले. पाणी वाटपाची सेवा श्री नरेंद्रचार्यजी महाराज भक्त परिवाराने निस्वार्थपणे पार पाडली.

सूत्रसंचालन व आवाहन

कार्यक्रमाचे शिस्तबद्ध व प्रभावी सूत्रसंचालन ह.भ.प. आर. डी. महाजन, लक्ष्मणराव पाटील व रमेश चौधरी यांनी केले. देणगी स्विकारण्याची जबाबदारी आर. पी. पाटील, गुलाब महाजन, चैत्राम महाजन व संजय पवार यांनी सांभाळली.

मरीआई मंदिराच्या उर्वरित जीर्णोद्धार कामांसाठी भाविकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले.

भजन कार्यक्रमाने भक्तिमय वातावरण

भंडाऱ्याच्या आदल्या रात्री श्री मरीआई माता मंदिरात धार्मिक भजनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. भजन, नामस्मरण व हरिपाठामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले होते. आई मरीमातेच्या कृपेने सर्वांवर सुख, शांती व समृद्धी नांदावी, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

LIVE । दादांना अखेरचा निरोप । लाखो जनसमुदायांच्या डोळ्यात पाणी…

राजकारणातील ” दादा ” माणूस गेला

Mari Mata Temple

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS