Nath Sampradaya | नाथांच्या मूर्तींची विटंबना! आरोपींना कठोर शिक्षा द्या – धरणगावात नाथभक्तांचा आक्रोश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Nath Sampradaya धरणगाव | साक्षीदार न्यूज | नवनाथ मंदिरातील पवित्र मूर्तींच्या विटंबनेच्या घटनेचा तीव्र निषेध करत धरणगावात नाथभक्त आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नाथभक्त परिवाराच्या वतीने तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.

- Advertisement -

मौजे हिंगणा, वैजापूर (ता. शेगाव) येथील नवनाथ मंदिरात अज्ञात समाजविघातकांनी घुसखोरी करून नवनाथ संप्रदायातील अत्यंत पवित्र व पूजनीय असलेल्या नवनाथांच्या मूर्तींची तोडफोड व विटंबना केल्याची गंभीर घटना २७ व २८ जानेवारी २०२६ दरम्यान घडली. या घटनेमुळे नाथभक्तांच्या धार्मिक भावना तीव्र स्वरूपात दुखावल्या गेल्या आहेत.

Nath Sampradaya
Nath Sampradaya

या पार्श्वभूमीवर श्री चैतन्य नवनाथ सिद्ध आश्रम, कोळपिंप्री (जि. जळगाव) चे अध्यक्ष दिनेश जिजाबराव काटे (प.पू. गुरुवर्य बालकनाथ महाराज) यांच्या नेतृत्वाखाली नाथभक्तांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले. निवेदनात धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक वारसा संरक्षण आणि सार्वजनिक शांततेच्या दृष्टीने ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

निवेदनात दोषी आरोपींची तात्काळ ओळख पटवून अटक करावी, प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. सात दिवसांत ठोस प्रगती न झाल्यास कायदेशीर व लोकशाही मार्गाने पुढील आंदोलन करण्याचा इशाराही नाथभक्तांनी दिला आहे.

हे निवेदन धरणगाव तहसीलचे निवासी नायब तहसीलदार लक्ष्मणराव सातपुते आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांना देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नाथभक्त उपस्थित होते. “आरोपीला कठोर शासन झालेच पाहिजे” याप्रसंगी सुभाषनाना पाटील, मुरलीधर पाटील, दिलीप पाटील, गणेश सोननी, संतोष महाजन, नरेंद्र (पप्पू) महाजन, विनोद पाटील, मनिष चौधरी, योगेश महाजन, कैलास मराठे, जगन्नाथ भोई, प्रदीप चौधरी, वासुदेव माळी, जितेंद्र पाटील (महाराज), शाम पाटील, देविदास पाटील, गजानन सोनवणे, हितेश धनगर, अंकुश चव्हाण, ललित महाजन, हेमंत महाजन, अविनाश चौधरी, आनंद पाटील (पहेलवान), गणेश निकम, दिपक महाजन, पवन मराठे, दयाराम महाजन, रविंद्र पाटील, कृष्णा महाजन, गणेश जाधव, ज्ञानेश्वर जाधव, आकाश कुंवर, दिनेश पाटील, मोहीत पवार, लक्ष्मणराव पाटील, परशुराम पाटील, पंकज महाले, जयेश पाटील, शशिकांत पाटील, आनंद श्रीराम, समाधान महाजन, यशोदीप सोनवणे आदी धरणगाव तालुका व शहरातील नाथभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोपीला कठोर शासन झालंच पाहिजे या मागणीसाठी नाथभक्तांनी दिलेल्या घोषणांनी तहसिल व पोलीस स्टेशनचा परिसर दणाणून निघाला.

LIVE । दादांना अखेरचा निरोप । लाखो जनसमुदायांच्या डोळ्यात पाणी…

राजकारणातील ” दादा ” माणूस गेला

Nath Sampradaya

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS