Sant Tukaram Jayanti | धरणगावात संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर; भव्य कीर्तन सोहळ्यात भक्तिरसाची उधळण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Sant Tukaram Jayanti धरणगाव | साक्षीदार न्यूज | धरणगाव येथे संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या जयंती व वसंत पंचमीच्या पावन पर्वानिमित्त नाथभक्तीचा जागर मोठ्या भक्तिभावात अनुभवायला मिळाला. समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळ, लहान माळीवाडा आणि समस्त नाथभक्त परिवार धरणगाव ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजता लहान माळीवाडा, धरणगाव येथे भव्यदिव्य जाहीर कीर्तन सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला.

- Advertisement -

Sant Tukaram Jayanti

या कीर्तन सोहळ्यात नवनाथ कथाकार ह.भ.प. गणेश महाराज कुदळे (श्री दत्त देवस्थान, श्रीक्षेत्र चिंचोळी – अहिल्यानगर) यांनी आपल्या प्रभावी व रसाळ कीर्तनातून संत तुकाराम महाराजांचे जीवनकार्य, अभंगांची गूढता आणि भक्तीमार्गाचे तत्त्वज्ञान उपस्थित भाविकांसमोर उलगडले. त्यांच्या कीर्तनाने उपस्थित भक्तगण भक्तिरसात तल्लीन झाले.

- Advertisement -

कीर्तनपूर्वी ह.भ.प. गणेश महाराज कुदळे, परमपूज्य गुरुवर्य बालकनाथजी महाराज आणि समस्त नाथभक्तांनी संतोष महाजन यांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर गुरुवर्य बालकनाथजी महाराज यांची घोडाबग्गीमधून सवाद्य मिरवणूक भवानी नगर – मरीआई – नवेगाव – लहान माळीवाडा मार्गाने काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान अनेक महिला भगिनींनी औक्षण केले, तर भाविकांनी गुरुवर्यांचे आशीर्वाद घेतले.

कीर्तनादरम्यान नवनाथ संप्रदायाची परंपरा, आद्य नवनाथ श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्म, तपश्चर्या, गुरु-शिष्य परंपरेतील नाथांचे कार्य तसेच लोककल्याणासाठी केलेल्या साधनेचे हृद्य वर्णन करण्यात आले. संन्यास, नामस्मरण व योगमार्गाचे प्रेरणादायी प्रसंग कथन करत भाविकांना अध्यात्मिक उंचीवर नेण्यात आले.

यावेळी नवनाथ संप्रदायावर आधारित भक्तीगीते, अभंग, नामघोष आणि नाथपंथीय पदांनी परिसर दुमदुमून गेला. “नाथा रे नाथा”, “अवधूता अवधूता” या घोषणांनी वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाला भजनी मंडळ – श्री संतकृपा वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव यांनी सुरेल अभंग-भजनांची साथ दिली.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून गुरुवर्य बालकनाथजी महाराज (संस्थापक अध्यक्ष – श्री चैतन्य नवनाथ सिद्ध आश्रम, नवनाथ नगरी, कोळपिंप्री) उपस्थित होते. त्यांनी नवनाथभक्ती, संप्रदायाचे सामाजिक व आध्यात्मिक कार्य आणि कलियुगात नामसाधनेचे महत्त्व विशद केले. “जीवब्रह्म सेवा हाच खरा परमार्थ” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजाचे खजिनदार लक्ष्मणराव पाटील यांनी केले, तर आभार श्री गणेश पाटील यांनी मानले. याप्रसंगी ह.भ.प. गणेश महाराज कुदळे व गुरुवर्य बालकनाथजी महाराज यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. तसेच ह.भ.प. नाना महाराज, सुभाष नाना कोळपिंप्री, गायनाचार्य नवनाथ महाराज कदम, मृदंगाचार्य विशाल महाराज नवघरे, विणेकरी ह.भ.प. दीपक महाराज, गायनाचार्य चैताली तोडमल, ज्ञानेश्वरी बेल्हेकर व चांदणी थोरात यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

तुकोबांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा कीर्तन सोहळा शिस्तबद्ध, भक्तिभावपूर्ण व अध्यात्मिक वातावरणात पार पडून उपस्थित भाविकांच्या मनावर अविट छाप उमटवून गेला. कार्यक्रमास गावातील व परिसरातील महिला-पुरुष, अबालवृद्ध तसेच बालगोपालांची लक्षणीय उपस्थिती होती.

संकट मोचक गिरीश महाजन संकटात सापडणार का ?

उमेदवार,महिला,कार्यकर्ते यांयाच्यावर पोलिसांचा जोरदार लाठीमार

मतदान केंद्रावर पोलिस आणि उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राढा

Sant Tukaram Jayanti

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS