Phenomenal Music Group ; डोंगर कठोऱ्याचे डिगंबर तायडे यांचा फिनॉमीनाल म्युझीक ग्रुपच्या गायन स्पर्धत प्रथम क्रमांक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल ( साक्षीदार न्युज ) ; – तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवासी डिगंबर तायडे यांनी गगन भरारी घेत रोवला डोंगर कठोरा वासियांच्या शिरपेचात मानाचा तुरा संपूर्ण देशात फिनॅामीनाल म्युजीक ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गायन स्पर्धेत मिळविला अव्वल क्रमांक कौतुकास्पद कामगिरी विशेष यश निवड विशेष डोंगर कठोरा येथील सर्व लहान थोरांचे परीचीत आदरणिय सिताराम सूका तायडे (सिताराम मास्तर) यांचे चिरंजीव व सध्या डोंबिवली मुंबई स्थित मुंबई प्रधीकरणात सीव्हील इंजीनीयर म्हणुन कार्यरत राहून सेवानिवृत्त झालेले डिगंबर सिताराम तायडे यांनी फिनॅामीनाल म्युजीक ग्रुपतर्फे संपूर्ण भारतात घेण्यात आलेल्या गाण्याची प्रतीयोगीता स्पर्धेत अव्वल स्थान पटकावून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्याशा अशा डोंगर कठोरा खेडेगावातील बांधवांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.सदरहू डिगंबर तायडे स्पर्धा जिंकल्याबद्दल समस्त डोंगर कठोरकर बांधवांचा हा सत्कार असल्याचे मानले जात आहे.

- Advertisement -

स्पर्धा हि फिनॅामीनाल म्युजीक ग्रुप तर्फे संपूर्ण देशात घेण्यात आली व यादरम्यान ज्यास्तीत ज्यास्त लाईक करण्यात आलेल्या गाण्याची निवड हि अंतिम विजेत्याच्या रूपाने त्यांच्या कडून करण्यात आली.दरम्यान तीन राउंडमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत डिगंबर तायडे यांनी गायिलेल्या गाण्यला मोठी पसंती मिळाली असुन परिणामी यात डिगंबर तायडे यांनी गायिलेल्या मोहम्मद रफी यांच्या “ओ तेरे प्यार का गम ” सुमधुर गाण्याने आकाशाला गवसणी घालीत भारत भरातून सहभागी प्रतियोगीत्या मधून प्रथम क्रमांक पटकाविला सदरील त्यांच्या यशामुळे डोंगर कठोरा वासियांची मन उंचावली आहे.या यशात त्यांना त्यांच्या धर्मपत्नी शकुंतला डिगंबर तायडे यांचा मोलाचा हातभार लाभला आहे.सदरील स्पर्धा डिगंबर तायडे यांनी स्वतःच्या मेहनतीवर जिंकली असून देखील त्यांनी या यशाचे श्रेय्य समस्त कठोरकर बांधवांचे असून यापुढील आपले संपूर्ण आयुष्य डोंगर कठोरा गावच्या विकासाकरिता वाहून घेण्यात येईल अशी भावना त्यांनी आपल्या निवडीबद्दल व्यक्त केली आहे.डिगंबर तायडे यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुक केले जात आहे .

Phenomenal Music Group

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS