7/12 उतारा | डिजिटल 7/12, 8-अ आणि फेरफार उतारे झाले कायदेशीर वैध – फक्त 15 रुपयांत डाऊनलोड करा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

7/12 उतारा | साक्षीदार न्यूज | महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेत डिजिटल सातबारा, 8-अ आणि फेरफार उताऱ्यांना अधिकृत कायदेशीर मान्यता दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची अधिकृत घोषणा करत हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्याची माहिती दिली.

- Advertisement -

या निर्णयामुळे आता सातबारा उतारा, 8-अ उतारा किंवा फेरफार मिळवण्यासाठी तलाठी किंवा ग्रामसेवक कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. नागरिक थेट महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून डिजिटल स्वरूपात हे उतारे डाऊनलोड करू शकणार आहेत. हे सर्व उतारे सरकारी, निमसरकारी, बँकिंग तसेच न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध राहणार आहेत.

डिजिटल सातबारामध्ये तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची गरज पूर्णतः संपुष्टात आली असून, या उताऱ्यांमध्ये डिजिटल स्वाक्षरी, QR कोड तसेच 16 अंकी पडताळणी क्रमांक असणार आहे. प्रत्येक उताऱ्यासाठी केवळ 15 रुपयांचे नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. या निर्णयाचा थेट फायदा शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांना होणार आहे.

- Advertisement -

डिजिटल 7/12, 8-अ आणि फेरफार उतारे कसे डाऊनलोड कराल?

स्टेप 1

महाभूमीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या:
👉 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/

स्टेप 2

ओटीपी आधारित लॉगिन पर्याय निवडा. मोबाईल क्रमांक टाका. आलेला ओटीपी भरून लॉगिन करा.

स्टेप 3

जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
त्यानंतर ‘अंकित सातबारा’ किंवा ‘अक्षरी सातबारा’ हा पर्याय निवडा.

स्टेप 4

सर्व्हे नंबर किंवा गट क्रमांक टाका.
पिक पाहणीचा डेटा हवा असल्यास तो पर्यायही निवडू शकता.

स्टेप 5

प्रत्येक उताऱ्यासाठी 15 रुपये ऑनलाईन पद्धतीने भरावेत.
रिचार्ज केल्यानंतर लगेच पीडीएफ स्वरूपात सातबारा, 8-अ किंवा फेरफार उतारा डाऊनलोड करता येईल.

दुसरा पर्याय

नवीन नोंदणीसाठी तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल, पत्ता, जिल्हा आदी माहिती भरावी लागेल.
यानंतर लॉगीन आयडी तयार करून वर दिलेल्या पद्धतीने सातबारा, 8-अ व फेरफार उतारे डाऊनलोड करता येतील.

महाराष्ट्र शासनाने डिजिटल 7/12, 8-अ आणि फेरफार उताऱ्यांना कायदेशीर मान्यता दिली आहे. आता फक्त 15 रुपयांत महाभूमी वेबसाईटवरून थेट डाऊनलोड करा. संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS