Digital Media डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेची जिल्हा कार्यकारणी जाहीर
धाराशिव । सुरज आबाचने । डिजिटल मीडिया हा येणाऱ्या काळात मीडिया क्षेत्रात मुख्य प्रवाह ठरणार असून या क्षेत्रात शिस्त व कायद्याच्या चौकटीत बसवणे अत्यंत महत्वाचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्यातील राजकीय विश्लेषक,जेष्ठ पत्रकार तथा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी तुळजापूरच्या शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकारांच्या बैठकीत मत व्यक्त करत धाराशिव जिल्हा कार्यकारणीची निवड मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते धाराशिव जिल्ह्याच्या सर्व नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देन्यात आले.यावेळी डिजिटल मीडिया संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,सुभाष चिंदे,राज्य समन्वयक इकबाल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना धाराशिव जिल्हाध्यक्षपदी आयुब शेख,जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद राऊत व दिनेश सलगरे यांची निवड करण्यात आली तर जिल्हा कार्यकारणी सचिवपदी पत्रकार सचिन बिद्री यांची निवड करण्यात आली, जिल्हा कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर गवळी,कोषाध्यक्षपदी सूरज बागल,जिल्हा संघटक म्हणन शिवाजी नाईक, तुळजापूर तालुका अध्यक्षपदी प्रदीप अमृतराव, तालुका उपाध्यक्षपदी राजेंद्र स्वामी,प्रभाकर जाधव, तुळजापूर शहराध्यक्षपदी सचिन ताकमोघे,शहर उपाध्यक्षपदी अमीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्य कार्यकारणी सदस्यपदी अनिल आगलावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे..या सोहळ्यात पत्रकार गोविंद खुरूद, संतोष दुधभाते, सिध्दीक पटेल, सतिश फत्तेपुरे, संजय खुरुद, राजेंद्र स्वामी, लक्ष्मण दुपारगुडे, राहुल कांबळे. चांद शेख, शिवाजी नाईक, अजित चव्हाण. प्रभाकर जाधव,विशाल देशमुख, सुरज आबाचने, बालाजी साने, विकास गायकवाड,शिवराज पाटील यांच्यासाह धाराशिव जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.