साक्षीदार | १ नोव्हेबर २०२३ | भारत सरकारच्या मालकीची नवी दिल्ली स्थित एक अभियांत्रिकी आणि उत्पादन कंपनी म्हणून भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही असून त्यामाध्यमातून सुपरवाइजर ट्रेनी (मेकॅनिकल), सुपरवाइजर ट्रेनी (सिव्हिल) आणि सुपरवाइजर ट्रेनी (एचआर) या पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. डिप्लोमाची पदवी असलेले उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरतील. अधिक माहितीसाठी BHEL च्या संकेतस्थळाला भेट देण्यास विसरू नका.
सुपरवाइजर ट्रेनीच्या (मेकॅनिकल) 30, सुपरवाइजर ट्रेनीच्या (सिव्हिल) 30 आणि सुपरवाइजर ट्रेनीच्या (एचआर) 15, अशा एकूण 75 जागांसाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडकडून भरती जाहिरात काढण्यात आली आहे. खुला प्रवर्ग तसेच ओबीसीचे उमेदवार 65 टक्के गुणांसह उत्तीर्ण असले पाहिजे. एससी व एसटी प्रवर्गातील उमेदवारांना किमान 60 टक्के गूण असले पाहिजे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत असावे. एससी व एसटी उमेदवारांना वयात 05 वर्षे सूट मिळेल, तर ओबीसी उमेदवारांना वयात 03 वर्षे सूट मिळेल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल. खुला प्रवर्ग तसेच EWS/OBC उमेदवारांना अर्ज भरताना 795 रूपये फी लागेल. SC/ST/PWD/ExSM उमेदवारांना 295 रूपये फी लागेल. उमेदवारांच्या निवडीसाठी डिसेंबर 2023 मध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे.