एका सहा वर्षीय बालिकेला घरात उचलून नेत युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पैठण तालुक्यातील एका गावात घडली आहे . सदर प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पैठण पोलिसांनी संशयित युवकाविरुद्ध शुक्रवारी (२९ डिसेंबर) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, केलेल्या संशयित आरोपीला अटक करण्यासाठी पैठण पोलीस शोध घेत आहे .बाळू ज्ञानोबा जाधव असे संशयित आरोपीचे नाव आहे .पैठण तालुक्यातील एका गावात पीडित चिमुकली राहते. ती गावातीलच शाळेत शिकत आहे . मंगळवारी (२६ डिसेंबर) शाळा सुटल्या हि चिमुकली आपल्या घरी जात असताना बाळूने तिला थांबवले. आणि तिला उचलून घरात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
घाबरलेल्या अवस्थेत हि चिमुरडी आपल्या घरी आल्यावर मुलीची परिस्थी पाहून आईने तिला काय झाले याची चिचारांना केल्यावर बाळूने केलेल्या गैरकृत्याबद्दल तिने आईला सांगितले. घडलेला सर्व प्रकार आईने आपल्या नातेवाईकांना सांगितल्यावर लगेच पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली .या घटनेनंतर बाळू गावातून फरारी झाला. पोलिसांनी बाळूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत.