सातपुड्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल ( सुरेश पाटील ) ; – सातपुडा पर्यताच्या रांगेत असलेल्पा रावेर तालुक्यातील विश्राम जिन्सी या आदिवासी गावात महाराष्ट्र राज्यांचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त यावल रावेर आश्रय फाउंडेशन माध्यमातुन शालेय साहित्य वितरणासह कौतुकास्पद असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

- Advertisement -

याप्रसंगी आश्रय फाऊंडेशन या समाजसेवी संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ. कुंदन सुधाकर फेगडे यांच्या तर्फे देवाभाऊ सेवापर्व सुरु करण्यात आला.यात देवाभाऊ कि पाठशाळा या उपक्रमाच्या माध्यमातून जनजातीय क्षेत्रात लहान मुलांना अभ्यासाची,वाचनाची व शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून पाड्यांवर वर्ग भरविले जाणार असुन तसेच आज २५० विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले,वृक्षारोपण या सारखे अनेक उपक्रम ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या माध्यमातून करण्यात आले.

हा कार्यक्रम आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन सुधाकर फेगडे प्रमुख यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणा करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळेच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांना स्कुल बॅगसह शालेय साहित्य वाटप करण्यात आलीत,यावेळी ऑल विजवेल या रूग्णालयाचे डॉ.सचिन महाजन यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजित करण्यात आले होते,या कार्यक्रमास विश्राम जिन्सी ग्रामपंचायतचे सरपंच चरणसिंग पवार,उपसरपंच सौ.रेवाबाई पवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुळ पवार, धनलाला पवार,कांतीलाल पवार,राजु पवार,शिवाजी पवार,अमरसिंग पवार यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार उदय पाटील यांनी मानले या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Chief Minister Devendra Fadnavis.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS