जिल्हा कारागृह पुन्हा चर्चेत : बंदी असलेल्या कैद्याने केली अधीक्षकांना शिवीगाळ 

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | १८ ऑक्टोबर २०२३ | जळगाव जिल्हा कारागृह नेहमीच विविध कारणाने चर्चेत येत असते. नुकतेच एका आरोपीला आपली जळगाव कारागृहातून नाशिक जेल येथे रवानगी होणार असल्याचा राग आल्याने त्याने थेट कारागृह अधीक्षकांना शिवीगाळ करून खिडकीच्या काचा फोडल्याचा धक्कदायक प्रकार घडला असून यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस स्थानकातील गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी लखन उर्फ गोलू दिलीप मराठे हा न्यायालयाच्या आदेशानुसार ३ ऑगस्टपासून जळगाव कारागृहात आहे. त्यानंतर न्यायदंडाधिकारी जळगाव यांनी १३ ऑक्टोबर रोजीच्या आदेशानुसार त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार जळगाव मुख्यालयातील पथक आज १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जळगाव कारागृहात लखन उर्फ गोलू याला घेण्यासाठी दाखल झाले असता आपली नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे बंदी लखन उर्फ गोलू याचा समजले.

त्यानंतर नातेवाईकांच्या मुलाखतीनंतर सर्कल २ मधून बॅरेक क्रमांक ७ मध्ये मुलाखत कक्षाजवळ असलेल्या कारागृह अधिक्षक कार्यालयाच्या मागील बाजूस खिडकीची लोखंडी जाळी हाताने काढून काच तोडून तरूंग अधिक्षक ए.आर. वांडेकर यांना आर्वच्च भाषेत बोलून माझी जेलची बदली पोलीसांनीच केली असे म्हणून शिवीगाळ केली. याप्रकरणी वरीष्ठ तुरूंग अधिकारी गजानन विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS