back to top
शनिवार, सप्टेंबर 27, 2025

DMDK Party; धक्कादायक ; कोरोनामुळे या नेत्याचे निधन राजकारणात शोककळा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

DMDK Party; देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे . परंतु आरोग्य विभागाकडून घाबरण्याचे कारण नाही असे हि सांगण्यात येत आहे . मात्र काल अभिनेता-राजकारणी असलेले आणि DMDK पार्टीचे प्रमुख कॅप्टन विजयकांत यांचे निधन झाले आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती त्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर त्याठिकाणी त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते .

- Advertisement -

येथे क्लिक करा

Mangesh Chavan Broke Cafe: #BJP चे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली कॅफेची तोडफोड…

मंगळवारी DMDK पार्टीकडून सांगितले होते की, त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पक्षाने सांगितले होते की विजयकांत “निरोगी” आहेत आणि चाचणीनंतर घरी परततील. परंतु, आज पक्षाकडून सांगण्यात आले कि , त्यांची कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे .

- Advertisement -

विजयकांत ज्या एमआयओटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्यांनी मेडिकल बुलेटिन जारी केले होते की, ‘कॅप्टन विजयकांत न्यूमोनियामुळे अॅडमिट झाल्यानंतर व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही, 28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी त्यांचे निधन झाले.

भाजप नेत्या खुशबू सुंदर
भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले की, ‘आम्ही एक रत्न गमावले आहे. एक सोनेरी हृदय असलेला माणूस जो खरोखर खूप पात्र होता. आमचे प्रिय कॅप्टन, आमचे विजयकांत. सर, तुमच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांचे कुटुंबीय, चाहते आणि समर्पित कार्यकर्त्यांच्या मनःपूर्वक संवेदना. ओम शांती.

विजयकांत यांनी 154 चित्रपटांमध्ये काम केले
डीएमडीके प्रमुख यांना 20 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि या महिन्यात ते रुग्णालयातून घरी परतले होते. विजयकांत यांच्यावर श्वसनाच्या आजारावर रुग्णालयात उपचार सुरू होते. विजयकांत यांचा चित्रपट प्रवास शानदार असल्याने त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आणि 154 चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटानंतर ते राजकारणात आले. त्यांनी DMDK ची स्थापना केली आणि विरुधाचलम आणि ऋषिवंदियम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत दोनदा विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले.

विरोधी पक्षनेतेही होते
2011 ते 2016 या काळात ते तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षाचे नेते असताना त्यांची राजकीय कारकीर्द शिखरावर होती. अलीकडच्या काळात विजयकांत यांची तब्येत बिघडल्याने त्यांना वारंवार रुग्णालयात यावे लागत होते. त्यामुळेच त्यांना सक्रिय राजकीय सहभागातून माघार घ्यावी लागली.

DMDK Party

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS