साक्षीदार | १० नोव्हेबर २०२३ | प्रत्येक तरुण व तरुणीला नेहमीच वाटत असते कि आपले वय झाकण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असते. त्यासोबत वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे तयार होते. अनेकजण आणि अनेकजणींना वय लपवण्यासाठी या सुरकुत्या अडचणीच्या वाटतात. त्यासाठी नानातऱ्हेच्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर होतो. मात्र, ब्रिटनमधल्या एका कंपनीने एलईडी लाईट थेरपी मास्क आणला आहे. या मास्कच्या मदतीने चार आठवड्यांत सुरकुत्या आपसूक विरतात आणि चेहरा चकाकू लागतो. सुरकुत्या घालवणाऱ्या या मास्कला बाजारात आणण्यापूर्वी अनेक तपासण्यातून जावे लागले.
ब्रिटनमधल्या बाजारात सध्या अशा पद्धतीच्या मास्कची चलती आहे. तिथल्या अन्न व औषध प्रशासनाने अशा मास्कला बाजारात आणण्याची परवानगी दिली आहे. अशा पद्धतीचे मास्क वापरणाऱ्या महिलांपैकी ९५ टक्के जणींना त्यांच्या चेहऱ्यात फरक जाणवला. या मास्कमधील एलईडीतून विशिष्ट प्रकारचा प्रकाश चेहऱ्यावर पसरवला जातो. त्यामुळे सुरकुत्या कमी होतात. त्वचेचा तजेलदारपणा वाढतो. दिवसातून तीन वेळा १० मिनिटे हा मास्क वापरावा लागतो.