साक्षीदार | २ नोव्हेबर २०२३ | सध्या देशातील अनेक नागरिकांना आरोग्याबाबत अनेक अडचणी येत असतांना सध्या धावपळीच्या जीवनात अनेकदा शरीराकडे नेहमीच दुर्लक्ष होतं असते. त्यामुळे आपण अनेक आजारांना देखील बळी पडत असतो. या सगळ्यावर एक चांगला उपाय म्हणजे व्यायाम आणि योगासने. व्यायाम आणि योगासने केल्यावर शरीर निरोगी राहते.
योग आणि व्यायाम शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. परंतु व्यायाम करण्यासाठी अनेकदा वेळ मिळत नाही. घर आणि ऑफिसची कामे सांभाळून शरीराकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेकजण जिमला जातात. जिमला जाण्यासाठीदेखील पैसे आणि वेळ द्यावा लागतो. या सगळ्यावर उपाय म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही व्यायाम सांगणार आहोत जे तुम्ही बेडवर बसून किंवा झोपून करु शकतात.
क्रंचेस
पोटाची चरबी कमी करण्यासाठी क्रंचेस हा सर्वोत्तम व्यायाम आहे. ज्या लोकांना abs बनवायचे आहेत. त्यांच्यासाठी हा व्यायाम अत्यंत फायदेशीर आहे. हा व्यायाम करण्यासाठी बेडवर पाय वाकवून झोपा. त्यानंतर आपले हात डोक्याच्या मागे ठेवा. आणि आता पोटावर दाब देऊन उठण्याचा प्रयत्न करा. किमान ७ ते १० वेळा हे करण्याचा प्रयत्न करा.
एअर सायकलिंग
एअर सायकलिंग करणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. यात तुम्हाला फक्त पलंगावर झोपून सायकल चालवायची आहे. म्हणजेच पलंगावर झोपून तुम्हाला हवेत सायकलिंग करतात तसे पाय हलवायचे असतात. हा व्यायाम केल्याने तुम्ही पोट, कंबर आणि मांड्यावरील अतिरिक्त चरबी कमी करु शकता. हा व्यायाम तुम्ही ५ ते १० मिनिटांसाठी करा.
पाय लिफ्ट करणे
पाय हवेत लिफ्ट करणे हा सर्वात चांगला व्यायाम आहे. यासाठी पलंगावर पाठीवर सरळ झोपावे. त्यानंतर हात खाली ठेवा. यानंतर श्वास घेताना पाय वर करा. काही सेकंद थांबा आणि नंतर श्वास सोडा आणि पाय खाली घ्या. हा व्यायाम केल्याने तुमचे वजन कमी होईल.