Dodegurjar Premier League 2023 ; सुरत येथील “दोडेगुर्जर प्रीमियर लीग २०२३” सामन्यात चोपड्याची “वंदेमातरम” टीम ठरली उपविजेता.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

सुरत ; – बेस्तानमधील “साई फकीर” स्टेडियमला २०२३ प्रीमियर लीगमध्ये महाराष्ट्रातील चार संघ व सुरत मधील चार संघ, अशा एकूण आठ संघांनी मध्ये सहभाग घेतला होता. सदर प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक-उज्वल पाटील (सतखेडेकर) चेतन पाटील (कलालीकर) हुकूमचंद पाटील (मोहीदेकर) प्रमोद पाटील (वढोदेकर) यांनी सर्व आठही सामन्यांचे अतिशय सुंदर नियोजन बध्द आयोजन केले होते.

- Advertisement -

आयोजकांन कडून आकर्षक चषक व प्रशस्तीपत्र देऊन,
विजेता व उप विजेत्या संघांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील “मृत्यूंजय” हा संघ विजेता म्हणून तर “वंदेमातरम” संघ उपविजेता म्हणून ठरला.
विजेता व उपविजेता या दोघेही संघांमध्ये, अतीशय रोमांचक व चुरशीपुर्वक सामना खेळण्यात आला, सामना खेळतांना “वंदेमातरम” या संघाने, खेळाळू वृत्ती दाखवून अतिशय रोमहर्षक खेळ खेळून संघ उपविजेता म्हणून ठरला.

चोपड्याचा उपविजेता “वंदेमातरम” या संघाचे “प्रायोजक” सुरत येथील ऍड.विनोद पाटील (वेलेकर) यांनी आणि वरील सर्व आयोजकांनी देखील सर्व खेळाळू यांचे मार्गदर्शन व सर्व संघाचे मनोबल वाढविण्यासाठी, मोलाचे योगदान दिले. तसेच संघाचे नेतृत्व कर्णधार किरण पाटील (हनुमंतखेडेकर) तर उपकर्णधार-जितेंद्र पाटील (मजरेहोळकर) यांनी केले. सदरच्या संघात नंदकिशोर देशमुख (सुंदरगढीकर) गुड्डू पाटील (वाघळूदकर) भगवान पाटील (झुरखेडेकर) संदीप पाटील (मजरेहोळकर) गजानन पाटील (गाढोदेकर) सुरज देशमुख, गोलु देशमुख (सुंदरगढीकर) यश पाटील (पाळधीकर) मयूर पाटील (वर्डीकर) सुदर्शन पाटील (वाघळुदकर) गौरव पाटील (हनुमंत खेडेकर) या सर्व खेळाळूनी संघ उपविजेता होण्यासाठी खुप परिश्रम घेतले.

Dodegurjar Premier League 2023

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS