साक्षीदार | ३ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन जोर धरीत असतांना मनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार जर सरसकट मराठा आरक्षण देणार असेल तर आम्ही त्यांना वेळ देण्यास तयार आहोत. त्यामुळे वेळ घ्या पण सरसकट आरक्षण द्या असं म्हणत त्यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला. पण, मुख्यमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे जरांगे यांनी २ जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे. यावरून संभ्रम आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा त्यांची भूमिका स्पष्ट केली.
सर्वांच्या समक्ष ठरलं आहे. तेच म्हणाले की २४ डिसेंबर पर्यंत समीतीला वेळ दिलेला आहे. गायकवाड साहेबांचा शब्द आम्ही मानला. बच्चू कडू साक्षीदार आहेत. ते म्हणाले की २४ डिसेंबरपर्यंत तरी वेळ दया. मात्र बोलण्यात ऐकण्यात फरक झाला असेल. फार जास्त काही नाही सात-आठ दिवसांचा फरक आहे. पण खरं बोलयाचं झालं तर २४ डिसेंबर तारीख ठरली आहे. तेवढा वेळ पण देणार नव्हतो, पण त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला आत घेतलं आहे. सर्वांचं कल्याण होणार आहे म्हणून २४ डिसेंबरची तारीख दिली. मनोज जरांगे म्हणाले की, चर्चा सरसकट आरक्षण देण्यावर झाली आहे, सरसकटच्या जागी मागेल त्याला असा तो विषय आहे. दोन्ही एकच विषय आहेत. आपण समाजाशी खोटं बोलत नाही असेही जरांगे यांनी स्पष्ट केलं.