Charmakar Vikas Sangh साक्षीदार न्यूज |जळगाव | दि. 7 जुलै 2025 | डोंबिवली येथे भूषण पाटील याने फेसबुक लाइव्हद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांचा जातीवाचक उल्लेख करून अवमान केल्याचा आरोप आहे. याचवेळी, येवती (ता. बोदवड) येथे अमोल आनंदा बाविस्कर यांना उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून गावातील ज्ञानेश्वर पाटील, मंगला पाटील आणि कमला पाटील यांनी रात्री शिवीगाळ करत जातीवाचक शब्दांचा वापर करून अपमान केला. तसेच, त्यांना जिवंत मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे.
या दोन्ही घटनांचा चर्मकार विकास संघ, जळगाव यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या मागणीसाठी सोमवार, दि. 7 जुलै रोजी दुपारी चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांना निवेदन सादर केले.
निवेदन सादर करताना संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ सावकारे, जिल्हाध्यक्ष ॲड. अर्जुन भारुडे, सचिव प्रा. धनराज भारुळे, कार्याध्यक्ष राजेश वाडेकर, नाशिक विभाग अध्यक्ष मनोज सोनवणे, ज्येष्ठ मार्गदर्शक काशिनाथ इंगळे, बाळकृष्ण खिरोळे, रतीराम सावकारे, प्रकाश रोजतकर, उमाकांत भारुळे, लिलाधर भारुळे, प्रा. संदीप शेकोकार, प्रा. रवी नेटके आणि रिझायनर घुले उपस्थित होते.
चर्मकार विकास संघाने या प्रकरणांवर त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या घटनांमुळे समाजात तणाव निर्माण झाला असून, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्वरित कारवाई आवश्यक असल्याचे संघाने निवेदनात नमूद केले आहे.