कुटुंब व्यवस्था विस्कळीत होवू देवू नका : जयसिंग वाघ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ( सुनिल भोळे ) :- शिक्षण , नोकरी , व्यवसाय या व अन्य कारणांनी संयुक्त कुटुंब व्यवस्था आता संपल्यात जमा आहे , विभक्त कुटुंब व्यवस्थेतही आई , वडील , भाऊ , बहीण वेगवेगळ्या गावी राहत असून विशिष्ट दिवशी ते विशिष्ट ठिकाणी एकत्र येतात असे आजचे चित्र असल्याने त्यातच जोडीदारा विषयी वाढत असलेल्या अपेक्षा यामुळे मुला मुलींचे विवाह लवकर जुळत नाही . सामाजिक , कौटुंबिक भान राहत नाही . तेंव्हा नियोजित वधू , वर यांनी फार अटी , शर्ती न बाळगता विवाह करावा , कौटुंबिक जिव्हाळा ठेवावा व विस्कळीत होत असलेली कुटुंब व्यवस्था विस्कळीत होणार नाही याचे भान ठेवावे असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.

- Advertisement -

जळगाव येथील सैनिक सभागृहात आयोजित बौद्ध वधू वर परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करतांना वाघ बोलत होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. राजेश झाल्टये यांनी सांगितले की वधू , वर परिचय मेळावे घेणे , सामूहिक विवाह लावणे आज काळाची गरज आहे . मुला मुलींनी सामाजिक भान ठेऊन तसेच कौटुंबिक जबाबदारी ओळखून जबाबदार घटक म्हणून जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे .

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक चंद्रगुप्त सुरवाडे यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की , आज अनुरूप जोडीदार मिळणे दूर राहिले आहे तर वधूच मिळणे कठीण झाले आहे . पर राज्यातील , पर जातीतील मुलगी मिळाली तरी चालेल असे सांगितले जाते . या गोष्टीचा गैरफायदा अनेक लोक घेवून अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करीत आहेत .वीर सावरकर रिक्षा युनियन चे अध्यक्ष दिलीप सपकाळे , ॲड. रेखा कोचुरे , ॲड. दिलीप भुरे यांचीही समायोचीत भाषणे झालीत .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी तर आभारप्रदर्शन अशोक तायडे यांनी केले .सुरवातीस जयसिंग वाघ यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले .कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता चंदा सुरवाडे , सविता तायडे , बाबुलाल सोनवणे, किर्ती साबळे , उषाबाई सोनवणे , कोमल गुरचळ, उज्वला सोनवणे, प्रतीक्षा साबळे , विजय गुराचळ, मनीष साबळे , राहुल सोनवणे, मिलिंद साबळे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisement -

या मेळाव्यात १२५ मुला , मुलींनी परिचय करून दिला. मेळाव्यास जिल्हाभरातून लोक मोठ्यासंख्येने आले होते . मेळाव्यात अनेकांनी नोंदणी केली .

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS