DWA UK पुणे उरुळीकांचन। साक्षीदार न्युज । डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन उरुळी कांचन डी डब्ल्यू ए युके सरकारमान्य संस्थेच्या अध्यक्षपदी येथील डॉ गणेश आखाडे पूजा क्लिनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉ.संतोष राठोड मावळते अध्यक्ष यांचा कार्यकाल संपल्यामुळे त्याच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनची कार्यकारिणीची सभा आयोजित करण्यात आली होती. ह्यावेळी नूतन कार्यकारणीचे नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली.
यावेळी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे खजिनदार डॉ. समीर ननावरे यांनी मागील दोन वर्षातील संस्थेचा अहवाल सादर केला. यावेळी डी डब्ल्यू युके चे सन्माननीय सदस्य उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने डॉ. रवींद्र भोळे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन, मावळते अध्यक्ष डॉ. संतोष राठोड, सचिव डॉ शरद गोते खजिनदार डॉ.समीर ननावरे, डॉ.राजेंद्र भोसले, डॉ.दत्तात्रय वाकसे, डॉ. शैलेश कांचन फिजिशियन, डॉ. प्रशांत शितोळे, डॉ राजेश आखाडे , डॉ संतोष कथले,डॉ. विकास थोरात, डॉ. मयूर लिंभोरे, डॉ.नील शिर्के, डॉ.राज दिवेकर, डॉक्टर कदम,डॉ. सुबंध मॅडम, डॉ.राजश्री मोटे ,डॉ.शिर्के मॅडम डॉ. गायकवाड मॅडम, डॉ. पांडुरंग गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन उरुळी कांचन ची नवीन कार्यकारिणी ची निवड सर्वानुमते करण्यात आली. याप्रसंगी डॉ गणेश आखाडे अध्यक्ष, डॉ.प्रशांत शितोळे उपाध्यक्ष, डॉ. उमा कथले, उपाध्यक्ष, डॉ.शरद गोते सचिव, डॉ. परिमल परदेशी सहसचिव, डॉ.समीर ननावरे खजिनदार, डॉ. विजय फडतरे सह खजिनदार, सुनील गांगुर्डे कार्याध्यक्ष यांची निवड करण्यात आली. नव निर्वाचित अध्यक्ष डॉ. गणेश आखाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की संस्थेच्या मागील पदाधिकाऱ्यांनी दिवाळी पहाट, त्याचप्रमाणे डॉक्टर्स गेट-टुगेदर, दिवंगत वैद्यकीय व्यवसायिकांना श्रद्धांजली तसेच अनेक उपक्रम राबवलेले आहेत.
भविष्यामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रवींद्र भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेला , जागा व कायमस्वरूपी सभागृह मिळण्यासाठी प्रयत्न करू. तसेच डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने अनेक उपक्रम राबवण्यात येतील. डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याच्या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.