dr kalyani raut अहिल्यानगर | संतोष जाधव | ३ ऑगस्ट २०२५ युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने अहिल्यानगर येथे ३० जुलै २०२५ रोजी आयोजित एका विशेष समारंभात सौ. डॉ. कल्याणी संदीप राऊत यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेद क्लिनिकच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करताना महिलांच्या विविध आजारांवर मार्गदर्शन आणि सामाजिक कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यशवंत डागे यांनी भूषवले, तर युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अनसार शेख यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी संघाच्या विविध सामाजिक उपक्रमांद्वारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या कार्याची माहिती दिली. या समारंभाला राज्यभरातील पत्रकार बंधू आणि युवा पत्रकार संघाचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
सौ. डॉ. कल्याणी राऊत यांना शाल, श्रीफळ, ट्रॉफी आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक बांधिलकी आणि महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.