back to top
शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025

Dr. Manisha Mahajan Nair Hospital Mumbai. ; किनगाव येथील प्रा आ केंद्रातील डॉ मनीषा महाजन यांची मुंबई येथील नायर रुग्णालयात नियुक्ती.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Dr. Manisha Mahajan Nair Hospital Mumbai ; यावल ; – तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन यांची उच्च शिक्षणासाठी मुंबई येथील नायर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मानसोउपचार तज्ज्ञ म्हणुन नियुक्ती झाली असुन त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून दिलेल्या उत्कृष्ठ आरोग्य सेवेबद्दल किनगावसह परीसरातील नागरीकांनी त्यांच्या निरोप समारंभ कार्येक्रमात डाँ.मनिषा महाजन यांच्या कार्याचा गौरव करत पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही डाँ.महाजन यांच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल गौरव कैला.किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सन २०१२ ते २०१९ पासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नव्हते मात्र २०१९ ला डाँ.मनिषा महाजन यांनी येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार सांभाळला.

- Advertisement -

महीला वैद्यकीय अधिकारी असतांनाही डाँ.महाजन यांनी खंबीरपणे व वेळेचे भान न ठेवता स्वतःला आरोग्यसेवेत झोकुन दिले सातपुड्याच्या जंगलात काही गाव अशी आहेत ज्या ठिकाणी आजपर्यंत कोणीही वैद्यकीय अधिकारी पोहचले नव्हते मात्र डाँ.महाजन यांनी पहाडात तब्बल १३ कि.मी.पायी प्रवास करत आदीवासी पाड्यांनवर नागरीकांची आरोग्य तपासणी करत औषधोपचार केले.

डाँ.मनिषा महाजन या आपल्या सेवेदरम्यान मुख्यालयातच निवासाला राहील्या व दिवस असो किंवा रात्र त्यांनी परीसरातील नागरीकांना आरोग्य सेवा दिली मग ती रिक्षा मध्ये झालेली प्रसूती असो किंवा रस्त्यावर रात्री झालेला अपघात त्यांनी कधीही कशाची तमा न बाळगता रुग्ण आपला देव या भावनेने रूग्णसेवा दिली.डाँ.महाजन यांचा जिवन प्रवास अत्यंत संघर्षमय राहीला आहे एम.बी.बी.एस.पदवी मिळवण्या पासून ते मागील ८ वर्षात सरकारी नोकरी मध्ये असलेली निडर एकटी स्त्री आणि स्त्री असूनही खंबीरपणे त्यांनी आरोग्य सेवेला महत्व दिले.प्रशासनातील बारीक गोष्टींनपासून ते धडक निर्णय घेण्यापर्यंतची क्षमता या महीला सिंघम वैद्यकीय अधिकारी मध्ये आहे.

- Advertisement -

कोरोणा काळात तालुक्यातील सर्वात लहान वैद्यकीय अधिकारी असतांना देखील त्यांच्यातील काम करण्याची प्रशासकीय पद्धत व कर्मचारी वर्गावर असलेला वचक यामुळे तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे यांनी आपला चार्जे डॉ.मनीषा महाजन यांच्या कडे सोपवला होता.विशेष म्हणजे कोविड काळात डॉ.मनीषा महाजन यांनी अहोरात्र आरोग्यसेवा दिली यादरम्यान त्या आपला ९ वर्षाचा मुलगा व वयोवृद्ध आई,वडील यांना सुमारे ८ महीने भेटल्या नाहीत.तसेच किनगाव येथील सर्व कर्मचारी व पंचक्रोशीतील खाजगी डॉक्टर्स आणि काही देणगीदार यांच्या मदतीने आयुष्यमान भव अंतर्गत भव्य आरोग्य मेळावा ८ आँक्टोबर रोजी घेण्यात आला या आरोग्य मेळाव्याची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली या महाआरोग्य शिबिरात हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.जयंत मोरे यांनी डॉ.मनिषा महाजन यांच्या कार्याचा सन्मान केला व जिल्हाधिकारींच्या दालनात डाँ.मनिषा महाजन यांचा जिल्हाअधिकारी आयुष प्रसाद यांनी सत्कार केला.तर परीसरातील नागरीकांनीही डाँ.महाजन यांना निरोपदेत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डाँ.मनिषा महाजन यांची उच्चशिक्षणासाठी मुंबईच्या नायर रूग्णालयात नियुक्ती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केला सन्मान.

Dr. Manisha Mahajan Nair Hospital Mumbai.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS