रोटरीच्या प्रांतपालपदी डॉ.राजेश पाटील यांची निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (प्रतिनिधी) : – इगतपुरीपासून भंडारा-गोंदियापर्यंत विस्तारलेल्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३०३०च्या प्रांतपालपदी शहरातील प्रतिथयश बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश पाटील यांची (२०२६ – २७) साठी निवड झाली आहे. नाशिक येथील कॉन्फरन्समध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत डॉ.राजेश पाटील यांनी त्यांचे विरोधकांचा ३२ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत डॉ. पाटील यांना ११८ मते मिळालीत तर विरोधी उमेदवारास केवळ ८६ मते मिळाली.
जळगावातील प्रतिथयश बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रसिध्द असलेल्या डॉ.राजेश पाटील यांचे आकाशवाणी चौकात विश्वप्रभा हॉस्पिटल आहे. २०१७ – १८ मध्ये ते जळगाव नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक, तसेच २०१८ – १९ मध्ये आयएपी जळगावचे प्रेसिडेंट, २०१६ – १७ मध्ये जळगाव आयएमएचे सेक्रेटरी तर २०१७ – १८ मध्ये महाराष्ट्र आयएमएचे जॉइन्ट सेक्रेटरी म्हणून कार्य करण्यासोबतच ते रेडक्रॉस सोसायटीचे लाइफ मेंबर आहेत.

- Advertisement -

आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून ते रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे सभासद झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी आपल्या संवाद कौशल्य व कार्यतत्परतेच्या बळावर अल्पावधीतच त्यांनी कम्युनिटी सर्व्हिस मेडीकलचे चेअरमन, मेंबरशिप चेअरमन, ॲडव्हायझरी चेअरमन, क्लब ॲडमिनिस्ट्रेशन चेअरमन, कम्युनिटी सर्व्हिसेस चेअरमन, डिस्ट्रीक्ट ॲडमिनिस्ट्रेशन चेअरमन, असिस्टंट गर्व्हनर झोन ८, प्रेसिडेंट एनक्लेव्ह चेअरमन आदी महत्वाची पदे भूषविण्यासोबतच रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे २०११ – १२ मध्ये प्रेसिडेंट म्हणून कार्य केले आहे. त्यांनी आपल्या रोटरीच्या कार्यकाळात अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहे.

त्यांच्या कार्याचा धडाका व जनसंपर्क पाहता त्यांच्याकडे आलेली प्रांतपालपदाची जबाबदारीही ते लिलया पेलतील व रोटरीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून रोटरीला नव्या उंचीवर नेतील, असा विश्वास व्यक्त होत त्यांचे समाजातील सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 Governor Rotary

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS