Dr Shobhatai Satbhai साक्षीदार न्युज ; – आजच्या काळात महिला प़त्येक क्षेत्रात कार्य करीत असुन यशस्वी होत असुन पुरुषांच्या ही पुढे जात असुन त्या नासिक शहरातील यशस्वी झालेल्या महिला म्हणजे डॉ शोभा सातभाई. त्या पर्यावरण सारख्या क्षेत्रात यशस्वी कार्य सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी पणे कार्य करीत आहे या संदर्भात “हिरवाई” काव्यसंग्रहातील हरितक्रांती कविता खूप प़सिध्द झाली आहे
प्रा. डॅा. शोभा रविंद्र सातभाई यांचे विषयी:-
त्या नाशिक येथील रहिवाशी असून शिक्षण M.Sc.,B.ed. M.phil., ph. D. झालेले आहे . वनस्पतीशास्त्रात ph.D. केलेली आहे .
सध्या विद्यापीठात “ph.D.रिसर्च गाईड (Botany)म्हणून कार्यरत आहे .
देवळाली कॅम्प येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना M.phil., ph.D. चालू होते.
महिलांना आजच्या काळात संसार ,मुलबाळं ,नोकरी हे सगळ सांभाळून त्याना पुढील शिक्षण करण अवघड होत परंतु त्यांनी जिद्द आणि चिकाटी न सोडता शिक्षणाची आवड व सोबत प्रियाचे सहकार्य लाभले म्हणून शक्य झाले. शिक्षणाची आवड , साहित्याची व संस्कारांची शिदोरी ही आई – वडिलांकडून लाभलेली देणगी जीवनात उपयोगी ठरलेली असुन त्यांचे
वडिल साहित्यिक आहे – “अनमोल विचारधन “त्यांचे पुस्तक प्रकाशित झालेल आहे त्यांचे व काही पुस्तके पूर्वी “उजाडला काळ “आणि इतर हस्तलिखित स्वरूपात आहे .
संशोधन कार्याचा विषय होता , M.phil.- “Studies on preharvest fungal diseases of onion from Niphad ,Pimpalgaon and their management by ecofriendly components”
Ph.D. – “Diversity and Rhizhospere Mycoflora of Onion from Nashik District “
-कांदा पिकावरील बुरशीजन्य रोगांवरील प्रबंध व उपायदेखील विद्यापीठाला सादर केले .
वनस्पतीशास्त्रावरील पुस्तके लिहिण्याचीही मला आवड असल्यामुळे
सध्या “वनस्पती व आरोग्य “आणी “B for Botany “प्रकाशनाच्या वाटेवर आहे .
वनस्पतींची माहिती वरती गेस्ट लेक्चर ही घेते कि आपण आहारात खाणाऱ्या भाज्या व फळे यातील महत्वाचे घटक सांगते समाजाला हे माहिती असणे आवश्यक आहे असे वाटते.
you tube chhanel आहे , “आरोग्य- संस्कृती चॅनेल डॅा. शोभा रविंद्र सातभाई” या नावाने त्यावरती ही माहीती उपलब्ध आहे
साहित्यप्रवास -लहानपणापासूनच लिहिणे – वाचणे गाणे , नाटके , वक्तृत्व या सगळ्यांची आवड होती. कवितालेखन हि तेव्हा करत असे परंतु तेव्हा उदयास नाही आल् निसर्गकविता “या वनस्पतीशास्त्र विषयामुळे जास्त जवळच्या वाटल्या , त्यांवरती आधारित “हिरवाई “काव्यसंग्रह लिहिला . झाडे लावण्याचा संदेश यातून प्रामुख्याने देण्याचा प्रयत्न केलेला आहे ,
“हरितक्रांती “
“सगळ्यांनीच मंत्र जपा
एकेक झाड लावण्याचा
या देशात हरितक्रांतीला
घडवूनी आणण्याचा “
नका तोडू ही झाडे
झाडे लावून करूया आॅक्सीजनची भरपाई
शेतीमाय लावी लळा
जगाचा पोशिंदा
वनस्पती औषधरूपी वरदान
अशा कविता “हिरवाई” त आहे,
काही कविता चालीसहित जन्माला आल्या त्यांच रसिकांनी स्वागतच केल म्हणूनच दुसरा काव्यसंग्रह “मृदगंधाचा बहर “उदयास आला ., अनेक बहरदार कविता घेउन आता लवकरच पुन्हा नवीन दमदार साहित्यकृती आपल्या भेटीला घेउन येत आहे .
विद्यार्थ्यांना “अभ्यास व पर्यावरण “यावरती motivation lecture देते व याबरोबरच जिथे आमंत्रणपर बोलावले जाते तिथे त्यांची पुस्तके व रोपवाटिकी भेट देते. तसेच “आहार व व्यायाम “या विषयावरती माहिती देते
समाजाची बांधीलकी जोपण्याचा प्रत्येत्न त्या करीत आहे .
महिलादिनाच्या दिवशी मी महिलांना हा संदेश देउ इच्छिते ,
“गगनभरारी नाही अशक्य काही जेव्हा मन निर्धार करि आणूनी पंखात बळ घेउ उंच गगनभरारी “
या पर्यावरण, शैक्षणिक , सामाजिक व साहित्यिक कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळालेला आहे.







