साक्षीदार | ३० ऑक्टोबर २०२३ | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण मिळावे यासाठी आग्रही असतांना निर्णय होत नाही तर दुसरीकडे मनोज जरांगे हे अन्नपाण्याशिवाय उपोषणावर ठाम असून त्यांची प्रकृती खालावत चालल्यानं आता समाजानं त्यांच्यासाठी काळजी व्यक्त करत आहे. आम्हाला तुमची गरज आहे त्यामुळं तुम्हाला पाणी प्यावेच लागेल, अशी भूमिका घेतली. समाजाच्या या विनंतीनं भावूक होत अखेर जरांगेंनी चार घोट पाणी पिण्याचं मान्य केलं आहे.
मनोज जरांगे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असल्यानं मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. यावेळी मोठ्या जनसमुदायानं जरांगे यांच्यासमोर हात जोडून सामुहिकरित्या त्यांना ‘पाणी प्या, पाणी प्या’ अशा शब्दांत आर्त विनंती केली. आम्हाला तुमची गरज आहे त्यामुळं तुम्हाला पाणी प्यावेच लागेल, अशी भूमिका यावेळी त्यांनी घेतली.