साक्षीदार | ६ नोव्हेबर २०२३ | राज्य सरकारने गेल्या आठवड्यापूर्वी अनेक जिल्ह्यातील तालुक्यांना दुष्काळी जाहीर केले आहे. पण यंदा राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच नाशिकच्या चांदवड तालुक्यात दुष्काळामुळे पहिला बळी गेला आहे. कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली आहे.
नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाचा देखील भरोसा नाही. शेतात टाकलेला खर्च देखील पूर्ण निघतो कि नाही याची शाश्वती नाही. यामुळे शेतकरी संकटात आहे. यातूनच आलेल्या नैराश्यातून चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील रहिवासी चिंदु गुंड या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरात रात्रीच्या सुमारात गळफास घेत आत्महत्या केली. चिंदू गुंडू या शेतकऱ्यावर सोसायटीचे सुमारे एक ते दीड लाख रुपये कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या लिहून ठेवलेला चिठ्ठीत सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे असे लिहून त्याने आत्महत्या केली.