साक्षीदार | ३१ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरात अनेक दिवसापासून गावठी कट्यासह जिवंत काडतूस सापडत आहे. त्या संशयित आरोपीवर गुन्हा देखील दाखल होत असतांना पुन्हा एकदा शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरातील एकाला मद्याच्या नशेत गावठी कट्टा घेऊन फिरत असतांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात एक जण गावठी कट्टा घेऊन यशवंत नामदेव पाटील (४७) फिरत असल्याची माहिती २९ ऑक्टोबर रोजी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यावरून त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोहेकॉ उमेश भांडारकर पोकों तेजस मराठे, योगेश इंधाटे, अमोल ठाकूर हे तेथे पोहचले असता. त्या ठिकाणी यशवंत पाटील हा मद्याच्या नशेत गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याचे आढळून आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन जिवंत काडतूस देखील सापडले. कट्टा व काडतूस जप्त करून या इसमाला अटक करण्यात आली.