साक्षीदार | २२ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना सोलापूर – तुळजापुर महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा आज (बुधवार) अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघाताबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी सोलापूरहून लातूरकडे जाणाऱ्या बस चालकाचे कासेगाव जवळ स्टेरिंग वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ तर काहींना मुका मार लागला आहे. या अपघातामध्ये सहा प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस मधील प्रवासी पुणे, कर्नाटक आणि मराठवाड्यातील आहेत. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकीत करण्यात आली आहे अशी माहिती पाेलीसांनी दिली.








