साक्षीदार | १८ ऑक्टोबर २०२३ | मुंबई – आग्रा महामार्गावरील आर्वी गावाच्या शिवारात डंपरने प्रवासी रिक्षेला दिलेल्या धडकेत पाच प्रवासी जखमी झाले. हा अपघात ५ ऑक्टोबर रोजी घडला होता. याप्रकरणी १६ रोजी डंपर चालकाविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आर्वीच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला (क्र. एमएच १८-एन ७३४२) मागून येणाऱ्या डंपरने (क्र. जीजे ३४-टी ३००७) धडक दिली. या धडकेत रिक्षेत बसलेले शेख जुबेर शेख सलीम (वय ३२), नाजीया कौसर जुबेर शेख (वय २८), फाईजा जुबेर शेख (वय ५), खदिजा जुबेर शेख (वय ९ महिने), नदिम अंजूम शेख (३२, सर्व रा. देवपूर धुळे) हे जखमी झाले. या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले. शेख जुबेर शे. सलीम याने धुळे तालुका पोलिस स्टेशनला फिर्यादीवरून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.