साक्षीदार | १६ ऑक्टोबर २०२३ २२ वर्षीय तरुणी गेल्या चार दिवसापासून रुग्णालयात डेंग्यूची लागण झाल्याने दाखल होती पण दि.१४ रोजी तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात चेतना शांताराम पाटील या तरुणीचा मृत्यू झाला आहे.
- Advertisement -
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील खासगी रुग्णालयात चेतना शांताराम पाटील (वय २२) चार दिवसांपूर्वी ताप असल्याने दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दि. १४ रोजी रात्री उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. तावरे माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शांताराम पाटील यांची ती कन्या असून चिंचखेडा (ता. पाचोरा) या मूळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
Dengue
- Advertisement -