back to top
गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026

मनोज पाटलांच्या स्वागतावेळी जेसीबीच्या बकेटमधून कार्यकर्ता कोसळला !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | ९ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या आंदोलनापासून देशभर मनोज जरांगे पाटील यांची जोरदार चर्चा सुरु झाली असतांना त्यांनी राज्यभर दौरे सुरु केले असल्याने सत्ताधारी व विरोधक संभ्रमात पडले आहे. तर सध्या मनोज जरांगे पाटील यांचे अनेक शहरात जंगी स्वागत देखील करण्यात येत आहे. पण याच स्वागता दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.

- Advertisement -

मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी फुलांची उधळण करताना जेसीबीच्या बकेटमधून कोसळल्याने कार्यकर्ते जखमी झाले. सर्वाना जबर मार बसला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी अवघा महाराष्ट्र पिंजून काढणारे जरांगे पाटील यांच्या नाशिकमधील येवला शहराच्या दौऱ्यातील ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची आज छगन भुजबळांच्या मतदारसंघात जाहीर सभा होत आहे. यासाठी पंचक्रोशीतील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित लावणार आहेत. मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी येवलेकरांनी जय्यत तयारी केली असून याच दरम्यान अपघाताची घटना समोर आली. स्वागताची तयारी सुरु असताना अचानक एका जेसीबीची समोरील बाजूस असलेली लोडर बकेट खाली आल्याने जेसीबीवर असलेले चौघेही खाली पडल्याने अपघात झाला. यात चारही जण गंभीर जखमी झाले आहेत. मनोज जरांगे पाटील सध्या राज्याचा दौरा करत आहेत. गावागावात, चौकाचौकात मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतही होत आहे.

- Advertisement -

आज मनोज पाटील नाशिक जिल्ह्यात येवला येथे दाखल झाले आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांचे जेसीबीवरुन फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. यासाठी जवळपास 15 ते 16 जेसीबी स्वागतासाठी उभे होते. या जेसीबीमध्ये काही कार्यकर्ते पुष्पवृष्टीसाठी सज्ज झाले असतांनाच जेसीबीच्या बकेटवरील ऑपरेटरचे नियंत्रण सुटल्याने 4 कार्यकर्ते खाली पडून गंभीर जखमी झाले. या कार्यकर्त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतरही कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही, जरांगे पाटलांचे आगमन होताच पुन्हा पुष्पवृष्टी केली गेली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS