यावल : – ३० नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास यावलसह दहिगाव सीम कोर्टपावली महलखेडी मनवेल ,थोरगव्हाण ,पथराडे ,शिरागड शिवारात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने केळी पिक जमीनदोस्त झाले आहे. यावल तहसिलदार मोहनमाला नाझीकर ,साकळी मंडळधिकारी सचिन जगताप,तलाठी विजय वानखेडे ,कृषि साह्यक मार्कडेय मिटके ,कोतवाल विजय भालेराव यांनी प्रत्यक्ष शेतात जावून पंचनामे करीत आहे.
Banana Crop ; ३० नोव्हेंबरच्या रात्री वादळी वाऱ्या सह विजेच्या कडकडात मुसळधार पाऊस रात्रभर सुरु होता यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पंचनामे सुरु असून आकडेवारी अद्यापही समजली नाही.माजी.प.स.सदस्य अरुण पाटील ,गोविंद पाटील यांचा शेतातील केळी पुर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. मनवेल ,थोरगव्हाण परीसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सावखेडा सिम कोरपावली मोहराळा महलखेडी दहिगाव आदी भागांमध्ये हरभरा कांदा मका या पिकांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव जाणू लागलेला आहे याकडे कृषी विभागाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.