Yawal Farmer  | दुसखेड्यातील शेतकऱ्याचा आनंद द्विगुणित! चोरीला गेलेली ५५ हजारांची मोटर अखेर मिळाली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Yawal Farmer  यावल | साक्षीदार न्यूज | दुसखेडा येथील शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पाटील यांची चोरीला गेलेली सुमारे ५५,००० रुपये किंमतीची १२.५ हॉर्स पॉवरची मोटर अखेर मिळून आल्याने शेतकरी कुटुंबाने सुटकेचा श्वास घेतला आहे.

- Advertisement -

१ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरांनी नदीकाठावर बसवलेली ही मोटर चोरून नेली होती. २ फेब्रुवारी रोजी सकाळी राजेंद्र पाटील हे नेहमीप्रमाणे नदीवर मोटर सुरू करण्यासाठी गेले असता त्याठिकाणी मोटर नसल्याचे आणि वायर कापलेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील सौ. संगीता विशाल दांडगे यांच्याशी संपर्क साधला.

पोलीस पाटील यांनी ही बाब त्वरित फैजपूर पोलीस स्टेशन येथे कळवली आणि राजेंद्र पाटील यांना फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. फिर्याद दिल्यानंतर साधारण चार ते पाच दिवसांनी, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास, नदीवर मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना पाण्यात ही मोटर आढळून आली.

- Advertisement -

मच्छीमारांनी तात्काळ याची माहिती पोलीस पाटील संगीता दांडगे यांना दिली. पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता चोरांनी सुमारे ३०० ते ४०० मीटर अंतरावर नदीच्या पाण्यात मोटर लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर मूळ मालक राजेंद्र पाटील यांना नदीवर बोलावून गावातील तरुण राजू सोनवणेसंदीप गोसावी यांच्या मदतीने ती मोटर पाण्यातून बाहेर काढण्यात आली. नंतर सदर मोटर राजेंद्र पाटील यांना सुपूर्द करण्यात आली. मोटर पुन्हा मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

एकनाथ खडसेंना कोर्टाचा दणका! आधी दोषमुक्ती फेटाळली, आता थेट अजामीनपात्र वॉरंट
 एकनाथ शिंदेंच्या फोटोवर काला जादू? जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सोलापुरात खळबळ
पाचोऱ्याजवळ मध्यरात्री भीषण अपघात! कार पलटी होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी
 पिंप्राळा किरकोळ वादाचा शेवट तरुणाच्या…

Yawal Farmer 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS