साक्षीदार | ९ ऑक्टोबर २०२३ | राजकीय विळख्यात येण्याआधी नवनीत राणा स्वत: अभिनेत्री होत्या. त्यांनी तेलगू, तामिळ आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनयाच्या कारकीर्दीत त्यांनी जवळपास २४ चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्यात आहेत पण सध्या ते राज्याच्या राजकारणात अनेक विषयाने चर्चेत येत असतात.
खासदार नवनीत राणा या त्यांच्या राजकीय कारकीर्दीसह खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत येत असतात. त्या कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. तसेच विविध सण उत्सव त्या मोठ्या उत्साहाने साजरे करतात. नवरात्र काही दिवसांवरच येऊन ठेपली असताना आता नवनीत राणा यांचा गरब्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
नवनीत राणा यांनी अमरावतीत एका कार्यशाळेच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. यावेळी तेथील तरुण मुली, महिला यांनी गरबा नृत्याचे आयोजन केले होते. गरबा पाहिल्यावर नवनीत राणांनी देखील गाण्यांवर रास गरबा खेळला. गरब्यावर ताल धरल्याचा व्हिडीओ पाहून यावर राजकीय वतृळासह नेटकरी विविध कमेंट करत आहेत.
नवनीत राणा प्रत्येक सण उत्सव उस्ताहात साजरा करतात. गेल्या वर्षी देखील नवरात्र उत्सवात त्यांनी डान्स केला होता. त्यावेळी त्यांनी येथील एका स्टॉलवर बुढ्ढी के बाल बनवले होते. बुढ्ढी के बाल बनवतानाचा त्यांचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता. नवणीत राणा एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला डान्समध्ये टक्कर देताना देखील दिसल्या होत्या. नवणीत राणांना त्यांच्या नृत्यामुळे काहीवेळा ट्रोलही करण्यात आलं आहे. २ महिन्यांपूर्वी नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच धमकी देणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या होत्या.