ED R.L.Jewellers ; ईडीची आर.एल.ज्वेलर्सवर धाड ; 315 कोटींच्या 70 मालमत्ता जप्त !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १५ ऑक्टोबर २०२३ | राज्यभरात विविध ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली असून यात जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील एकूण अंदाजे 315 कोटींची ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

JALGAON FIRE ; जळगावातील आरएल शोरुमच्या कार्यालयाला आग !

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, राजमल लाखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरच्या बँक फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे.13 ऑक्टोबर 2023 रोजी पीएमएलए, 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील 70 स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या आहेत. या जप्त केलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे 315 कोटी आहे. दरम्यान, ईडीकडून याआधीही जळगावमधील राजमल लाखीचंद ज्वेलर्सवर छापेमारी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीचे असलेल्या या ज्वेलर्सवर ऑगस्ट महिन्यात छापा टाकण्यात आला होता. यावेळी तब्बल २४ तासांपासून अधिक काळ दुकानाची चौकशी करण्यात आली होती.

ED R.L.Jewellers

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS