Khandesh Educational साक्षीदार न्यूज | जळगाव येथील भरारी फाउंडेशन , वेगा केमिकल्स प्रा.लि. जळगांव व रोटरी क्लब जळगाव मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या २५०पाल्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व वार्षिक फी वाटप करण्यात आली. तसेज ४० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी द गार्डियन्स फाउंडेशन व दानशूर व्यक्तीच्या मदतीने सहकार्य व दत्तक घेण्यात येणार आहे .भरारी फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘शेतकरी संवेदना’ या अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे ११ वे वर्ष असून आतापर्यंत संस्थेने ६५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.
पोलीस कवायत मैदान परिसरातील पद्मालय सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमात खासदार स्मिता वाघ यांनी सामाजिक बांधिलकी जपून शेतकरी आत्महत्या यासारख्या संवेदनशील बाबीवर काम करत असलेल्या भरारी फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन व भालचंद्र पाटील यांनी संवेदनशील अशा या उपक्रमंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना भविष्यात वेगा केमीकल, जैन उद्योग समूह, जळगांव पीपल्स बँक या आस्थापनावर नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील,असे आश्वासीत केले. तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाउन तर्फे जास्तीत जास्त मदत करण्यात येईल,असे अॅड, किशोर पाटील यांनी सांगितले.त्याचप्रमाणे ,या उपक्रमासाठी भालचंद्र पाटील जैन उद्योग समूह, अडवोवते किशोर पाटील,माजी महापौर सीमा भोळे, दीपक सूर्यवंशी,डॉ . नीलेश चांडक, डॉ. पी आर चौधरी, ,बाळासाहेब सुर्यवंशी ,लखीचंद जैन, प्रशांत कोठारी,सपन झुनझुनवाला यांनी सहकार्य केले . याप्रसंगी महावीर सहकारी बँकेचे संचालक भास्कर कोळी, माजी सैनिक योगेश नेमीचंद पाटील,शैला चौधरी,दिपक विधाते ,विक्रांत चौधरी, अक्षय सोनवणे, सागर पगारीया, चित्रा चौधरी सुदर्शन पाटील,नंदू बारी, सुनंदा मोझे सागर परदेशी आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक रोटरीचे ॲड.किशोर पाटील, यांनी सूत्रसंचालन व आभार दिपक परदेशी मानले.








