Eknath Khadse Bhosari Land | एकनाथ खडसेंना कोर्टाचा दणका! आधी दोषमुक्ती फेटाळली, आता थेट अजामीनपात्र वॉरंट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Eknath Khadse Bhosari Land  मुंबई | साक्षीदार न्यूज | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन व्यवहार प्रकरणात मोठा कायदेशीर दणका बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एमपीएमएलए न्यायालयाने खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मंगळवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणात खडसे यांनाही मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.

- Advertisement -

भोसरी येथील कथित जमीन घोटाळा प्रकरणात शुक्रवारी आरोप निश्चिती होणार होती. मात्र एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे हे दोघेही न्यायालयात गैरहजर राहिल्याने विशेष न्यायालयाने नॉन-बेलेबल वॉरंट काढण्याचा आदेश दिला. त्यामुळे या प्रकरणातील अडचणी खडसे कुटुंबीयांसाठी वाढल्या आहेत.

एकनाथ खडसे हे महसूलमंत्री असताना भोसरी औद्योगिक वसाहतीतील एक भूखंड नियमांचे उल्लंघन करून त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी खरेदी केल्याचा आरोप आहे. हा भूखंड मूळ बाजारभावापेक्षा अत्यंत कमी किमतीत खरेदी केल्याचे या प्रकरणातील मुख्य आरोप आहेत. या व्यवहारामुळे राज्यभरात मोठी राजकीय खळबळ उडाली होती आणि त्यानंतर खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

- Advertisement -

या प्रकरणात 2016 मध्ये गुन्हा दाखल झाला असून तेव्हापासून सुनावणी सुरू आहे. 3 डिसेंबर 2025 रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने या जमीन विक्रीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना दोषमुक्त करण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली.

दरम्यान, या प्रकरणातील सत्र न्यायालयात सुरू असलेल्या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानेही नकार दिला होता. त्यामुळे आरोप निश्चितीचा मार्ग मोकळा झाला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

एकनाथ शिंदेंच्या फोटोवर काळी जादू? जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सोलापुरात खळबळ

 पाचोऱ्याजवळ मध्यरात्री भीषण अपघात! कार पलटी होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

पिंप्राळा किरकोळ वादाचा शेवट तरुणाच्या मृत्यूत, परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त

Eknath Khadse Bhosari Land

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS