Maharashtra Political News | “आशीर्वाद मिळाले तर शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री!” – शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाने राजकारणात खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Maharashtra Political News | साक्षीदार न्यूज | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. युती, आघाड्या, संभाव्य फाटाफूट आणि सत्तासमीकरणांवरून दररोज नवे दावे-प्रतिदावे समोर येत आहेत.

- Advertisement -

अशातच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या दाव्यानंतर भाजप तसेच शिंदे गटातील अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

दरम्यान, आता खुद्द शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना त्यांनी सूचक आणि खळबळजनक विधान केले आहे.

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्याविषयी विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले “प्रकाश आंबेडकर हे अनुभवी आणि मोठे नेते आहेत. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामकाजाची दिशा पाहिली असेल. त्यामुळेच त्यांना पुढील काळात शिंदे मुख्यमंत्री होतील, असे वाटत असावे.”

याचवेळी त्यांनी,“प्रकाश आंबेडकर यांचे आशीर्वाद असतील, तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात,”
असे विधान करून राजकीय चर्चांना आणखी हवा दिली.

दरम्यान, मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील “लवकरच मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल” असे भाकीत व्यक्त केले होते.

या सर्व घडामोडींमुळे सत्तासमीकरणे बदलणार का, कोणत्या दाव्यांना वास्तवाचा आधार मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Jalgaon Crime | निमखेडीत तरुणाची हत्या; राम मंदिराजवळ आढळला रक्तबंबाळ मृतदेह, जुना वाद संशयाच्या भोवऱ्यात
school nutrition meal scheme | शालेय पोषण आहार योजनेत १८०० कोटींची अनियमितता? हिवाळी अधिवेशनात गंभीर आरोप

Maharashtra Political News

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS