back to top
बुधवार, फेब्रुवारी 11, 2026

Eknath Shinde Black Magic | एकनाथ शिंदेंच्या फोटोवर काला जादू? जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सोलापुरात खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Eknath Shinde Black Magic | साक्षीदार न्यूज | जिल्हा परिषद निवडणूक मतदानाच्या पूर्वसंध्येला सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदेसेना उमेदवाराच्या घराबाहेर कथित काला जादू केल्याचा प्रकार समोर आला असून विजय–पराभवासाठी अंधश्रद्धेचा आधार घेतला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

- Advertisement -

ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.

मोहोळ तालुक्यातील पेनूर गटाचे उमेदवार व शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे यांच्या घराबाहेर हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रचार पत्रकावर हळदी-कुंकू टाकून, लिंबावर सुई व टाचण्या लावण्यात आल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे या प्रचार साहित्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोही असून त्यावर हळदी-कुंकू लावल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

या घटनेची माहिती पसरताच परिसरात हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या अवघ्या काही तास आधी हा प्रकार समोर आल्याने निवडणूक प्रक्रियेवर चर्चेला उधाण आले आहे.

महाराष्ट्रात नरबळी, अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी २०१३ मध्ये कायदा करण्यात आला आहे. मात्र तरीही दुर्गम भागांबरोबरच निमशहरी आणि पुरोगामी महाराष्ट्रातही अंधश्रद्धेचे प्रकार घडताना दिसत आहेत. निवडणुकीतील विजय वा पराभव हा काला जादूने नव्हे, तर सूज्ञ मतदारांच्या निर्णयाने आणि त्यांच्या मताने ठरतो, हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

पाचोऱ्याजवळ मध्यरात्री भीषण अपघात! कार पलटी होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी
 पिंप्राळा किरकोळ वादाचा शेवट तरुणाच्या मृत्यूत, परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त

Eknath Shinde Black Magic

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Revenue Department | अवैध वाळू वाहतुकीवर महसूलचा दणका! गिरणा...

Revenue Department भडगाव | गोरख माळी | तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाने कडक कारवाई करत दोन डंपर ताब्यात घेतले...

Social Work Maharashtra | वैचारिक स्वराज्यचा प्रेरणादायी सोहळा! बालकनाथ...

Social Work Maharashtra फरकांडे | साक्षीदार न्यूज | समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती, युवक घडवणूक आणि वैचारिक जागृतीच्या कार्यात सातत्याने सक्रिय असलेल्या वैचारिक स्वराज्य या संस्थेच्या वतीने...

Yawal Farmer  | दुसखेड्यातील शेतकऱ्याचा आनंद द्विगुणित! चोरीला गेलेली...

Yawal Farmer  यावल | साक्षीदार न्यूज | दुसखेडा येथील शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पाटील यांची चोरीला गेलेली सुमारे ५५,००० रुपये किंमतीची १२.५ हॉर्स पॉवरची मोटर अखेर...

RECENT NEWS