धरणगाव ; – तालुक्यातील कल्याणे होळ येथे पाणी भरण्याच्या कारणावरून एका वृध्द महिलेसह तिच्या पतीला लाकडांनी मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरूवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. या प्रकरणी मंगळवारी २ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कलाबाई जगन कापडणे (वय-६५) रा.कल्याणे होळ ता.धरणगाव या महिला आपले पती जगन खंडू कापडणे यांच्यासह वास्तव्याला आहे. गुरुवार २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पाणी भरण्याच्या कारणावरून कलाबाई जगन कापडणे यांना व त्यांचे पती जगन खंडू कापडणे यांना गावात राहणारे निकिता मनोज कापडणे, सोनी मनोज कापडणे, मनोज पुंजू कापडणे, रवींद्र पुंजू कापडणे, विनोद पुंजू कापडणे, छाया पुंजू कापडणे, ओम रवींद्र कापडणे आणि ज्योती विनोद कापडणे सर्व रा. कल्याणे रोड ता. धरणगाव यांनी लाकडी काठ्यांनी मारहाण करून बेदम मारहाण करत गंभीर दुखापत केली. दरम्यान या घटनेबाबत मंगळवारी २ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कुशल पाटील हे करीत आहे.