शेकोटीमुळे गंभीररित्या भाजलेल्या वृध्द महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – शहरातील निमखेडी शिवारातील साई पॅलेस परिसरात शेकोटीवर बसलेल्या वृध्‍द महिलेच्या साडी पेट घेतल्याने गंभीररित्या भाजल्या गेल्याची घटना बुधवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान गुरूवारी १८ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी १८ जानेवारी रोजी सकाळी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. बायजाबाई वामन सोनवणे वय-७१ रा.साई पॅलेस निमखेडी शिवार, जळगाव असे मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

- Advertisement -

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बायजाबाई वामन सोनवणे या महिला ह्या मुलगा, सून आणि नातवंडे यांच्यासोबत निमखेडी शिवारातील साई पॅलेस परिसरात वास्तव्याला होत्या. थंडीचे दिवस असल्या कारणामुळे बुधवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता त्या घराच्या पुढच्या हॉलमध्ये शेकोटी करून बसलेल्या होत्या. त्यावेळी अचानक त्यांच्या साडीच्या पदरला आग लागल्याने त्यात त्या गंभीरित्या भाजल्या गेल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी १८ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या पश्चात जगदीश आणि अशोक हे दोन मुले, विवाहित मुलगी, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर महाजन हे करीत आहे.

Elderly Woman Fire 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS