back to top
शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025

मुक्ताईनगर मतदारसंघातील निराशाजनक चित्र बदलवण्यासाठी रोहिणी खडसेंना निवडून द्या – शरद पवार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुक्ताईनगर (सुनील भोळे) : – विधानसभा मतदासंघ निवडणुक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रिय कृषी मंत्री खा .शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा मुक्ताईनगर येथे संपन्न झाली. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, आ शिरीष दादा चौधरी, शिवसेना उबाठा संपर्क प्रमुख परब, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, माजी आमदार अरुण पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटिल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार , डॉ जगदीश पाटील, महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगरच्या उमेदवार ॲड. रोहिणी खडसे, भुसावळचे उमेदवार डॉ राजेश मानवतकर, रावेरचे उमेदवार ॲड . धनंजय चौधरी,आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी नेते उपस्थित होते.

- Advertisement -

Sharad Pawar

यावेळी रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, ॲड. रोहिणी खडसे या गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात आहेत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगुन ॲड.रोहिणी खडसे, डॉ.राजेश मानवतकर, ॲड. धनंजय चौधरी यांना विजयी करण्याचे उपस्थितांना आवाहन केले

- Advertisement -

Sharad Pawar

यावेळी मार्गदर्शन करताना आ. एकनाथराव खडसे यांनी महायुतीच्या काळात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले, महागाई वाढली, तरुणांना रोजगार देणारे उद्योग इतर राज्यात पळवले गेले शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही हे चित्र बदलण्यासाठी महविकास आघाडीचे सरकार आणण्याचे त्यांनी जनतेला आवाहन केले मुक्ताईनगर मतदारसंघ विकासात मागे पडला असून, मतदारसंघांत गुंडगिरी वाढली असून जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे सर्व थांबवण्यासाठी उच्चशिक्षित असलेल्या ॲड. रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

Sharad Pawar

यावेळी रोहिणी खडसे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना मागच्या निवडणुकीत अल्प मतांनी पराभव झाला तरी गेले पाच वर्ष सतत मतदारसंघातील जनतेच्या सेवेत राहिले प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला जनतेच्या, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा प्रश्नांसाठी आंदोलने केली निवेदने दिली, जनसंवाद यात्रा काढून जनतेचे प्रश्न समस्या जाणून घेतल्या त्या सोडविण्याचा प्रयत्न केला त्यासाठी सर्वांची साथ लाभली ती कायम ठेवून आपल्याला मतदान करण्याचे रोहिणी खडसे यांनी जनतेला आवाहन केले.निवडून आल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याला आपले पहिले प्राधान्य असेल उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेऊन शेतीला पाणी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु, पर्यटन विकास करून व उद्योग धंदे आणून तरुणांना रोजगार देण्याचा आपला प्रयत्न राहिल त्यासाठी निवडून देण्याचे रोहिणी खडसे यांनी मतदारांना आवाहन केले

यावेळी मार्गदर्शन करताना शरदचंद्र पवार म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार आम्ही करत आहोत आणि हे तुमच्या शिवाय शक्य नाही. नरेंद्र मोदी हे ४०० खासदार हवे तसे सांगत होते. तेवढे लागत नाही पण लोकांना शंका आली. यात काही काळबेरं दिसत आहे. मात्र ४०० जागा जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत घटना बदलता येणार नाही अशी माहिती त्यांच्याच लोकांनी सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत बदल करण्याचं यांच्या मनात पाप होतं. याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात आली. त्यासाठी सर्व एकत्र आले. इंडिया नावाची आघाडी काढली. सर्वांना एकत्र केलं, तुम्ही साथ दीली राज्यात एकतीस खासदार निवडून आले वाटेल ते करू मात्र घटना बदल करू देणार नाही,” असं शरद पवार म्हणाले.

राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत पण गेल्या अडीच वर्षात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेचा उपयोग केला गेला नाही कशासाठी सत्तेचा उपयोग केला गेला हे आपण बघितले. शेतकरी अडचणीत आला आहे गेल्या सहा सात महिन्यात राज्यात ८५६ शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या घटना घडल्या या आत्महत्या कर्जबाजारीपणातून झाल्या उद्योगपतींचे कर्ज केंद्र सरकारने माफ केले पण शेतकऱ्यांचे का केले नाही असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. शिवरायांच्या या राज्यात गेल्या काही दिवसात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली , तरुणांच्या हाताला रोजगार नाही हे चित्र बदलायचे आहे त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे असे शरद पवार म्हणाले.

महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आली तर महालक्ष्मी योजने अंतर्गत राज्यात स्त्रियांना महिन्याला तिन हजार रुपये आणि मोफत बस प्रवास लागु केला जाईल. शेतकऱ्यांना तिन लाखा पर्यंत कर्ज माफ केले जाईल नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. बेरोजगार तरुणांना काम मिळेपर्यंत महिन्याला चार हजार रुपये दिले जातील प्रत्येक कुटुंबाचा पंचवीस लाखा पर्यंत आरोग्य विमा काढला जाईल. हे सर्व राबवण्यासाठी मतदानातून साथ द्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे शरद पवार यांनी जनतेला आवाहन केले. विशाल महाराज खोले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची सभेला उपस्थिती होती.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS