Shiv Sena ; साक्षीदार न्युज । सुनिल भोळे । आज कालचे राजकारण हे नेमके मोन्त्या दिशेने सुरु हे समजण्या पलीकडचे आहे . त्यामुळे हा निर्णय घेतला आहे असे धक्कदायक विधान शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्राम संसद कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात आपले मत बोलू दाखविले आहे . त्यामुळे शिवसेनेच्या राजकारणात एक मोठा धक्काच बसला आहे. एकनाथ शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार यांनी पुढील कोणतीही निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे शिवसेना पक्षात एकच खळबळ उडाली आहे.
शिंदे गटाच्या नेत्याचा निर्णय: राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह Shiv Sena
शिंदे गटाचे हे मोठे पाऊल नेमके कशासाठी घेतले गेले आहे, यावर सध्या चर्चा रंगली आहे. आगामी निवडणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय नेत्यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरणार आहे .
पक्षाच्या अंतर्गत हालचालींवर परिणाम
या निर्णयामुळे पक्षाच्या अंतर्गत हालचालींवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, इतर नेत्यांवरही याचा परिणाम होऊ शकतो.
शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या या निर्णयावर जनतेच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काहींनी याला फसलेले राजकारण म्हटले आहे. जनतेतून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असताना, या निर्णयाचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नवीन राजकीय समीकरणे ?
अब्दुल सत्तार यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेत Shiv Sena नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या निर्णयामुळे इतर पक्षही देखील सावध झाले आहेत. राजकीय तज्ञांच्या मते, आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता होऊ शकते असे देखील बोलले जात आहे .
एकनाथ शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. हा निर्णय पक्षाच्या राजकारणावर काय परिणाम होतो , हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. जनसामान्य नागरिक आणि इतर राजकीय पक्ष याकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत.