back to top
शनिवार, सप्टेंबर 27, 2025

Revenue Employees Association ; महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव,( प्रतिनिधी ) ; – जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी चोपडा गोदाम व्यवस्थापक यांची महसूल कर्मचारी संघटनेच्या दि.०९ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या सर्व साधारण सभेत निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येतं आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत हॉल येथे महसूल कर्मचारी संघटनेची सर्व साधारण सभा संपन्न झाली सभेमध्ये सर्वानुमते जिल्हयाची खालील प्रमाणे नविन कार्यकारीणी गठीत करण्यात आली आहे.

- Advertisement -

यांची निवड करण्यात आली .
अध्यक्ष : श्री. योगेश नन्नवरे, गोदाम व्यवस्थापक चोपडा,
उपाध्यक्ष : श्री. किरण बाविस्कर, मंडळ अधिकारी पिंप्राळा ता. जळगांव,
कोषाध्यक्ष :घनश्याम सानप, अ. का. कुळकायदा शाखा, जि. का. जळगाव,
कार्याध्यक्ष : अतुल सानप, अ. का. तहसिल कार्यालय रावेर,
सरचिटणीस : दिपक चौधरी, अ.का. आस्थापना शाखा, नि.का. जळगांव
वरील प्रमाणे नवनियुक्त पदाधिकारी दि.१०.१२.२०२३ पासुन जळगांव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना चे कार्यभार स्विकारतील याची सर्वांनी नोंद घावी असे जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस दिनकर मराठे यांनी कळविले आहे.प्रमुख अतिथी म्हणून देवेंद्र चंदनकर नायब राज्यपाल तहसीलदार, दिलीप बारी, नायब तहसीलदार, शैलेश परदेशी सह जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.आजच्या बैठक चे सूत्रसंचालन अभिजीत येवले, प्रास्त्वाविक रविंद्र माळी यांनी केले

महसूल कर्मचारी बांधव यांना सांविधनिकरित्या न्याय देवून महसूल कर्मचारी संघटनेला आणखी नावलौकिक मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल तसेच कर्मचारी बांधव यांच्या सहकार्याने गतिमान प्रशासन तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना देण्याचा मानस आहे तसेच संघटनेच्या माध्यमांतून कर्मचारी यांच्या हितासाठी सामूहिक विमा, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा उभा करणे, कर्मचारी बांधव यांना अडचणीच्या काळात मदत, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती तसेच नोकरी मार्गदर्शन बाबत पूर्ण मदत करण्यात येईल. तसेच महसूल विभाग हा प्रशासनाचा पाठीचा कणा असल्याने त्यात जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी अहोरात्र मेहनत घेवून जिल्ह्याचा प्रशासनिक नावलौकिक मध्ये भर पडेल त्यासाठी सर्वंमिळून सामूहिक प्रयत्न करणार आहोत.. सर्व कर्मचारी यांची एकजुठ ठेवून दरवर्षी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात विचार असून इतर आणखी विधायक काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष योगेश नन्नवरे यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

Revenue Employees Association

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS